पोर्ला येथे नाटकाचे उद्घाटन खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते संपन्न

46

. १४ जानेवारी २०२३

पोर्ला:- खास मकर संक्रांत निमित्य आज दिनांक- १४ जानेवारी २०२३ ला श्री. नाट्य कला मंडळ,पोर्ला ता.जि.गडचिरोली यांच्या सौजन्याने पोर्ला येथे सुयोग नाटय रंगभूमी वडसा प्रस्तुत:-संगीत हेच का माझं बाळ या नाटकांचे उदघाटन गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते रिबीन (फित) कापुन संपन्न झाले.*

*या नाटकाच्या उदघाटन प्रसंगी खासदार अशोक जी नेते यांनी बोलतांना नाटक हा समाज प्रबोधनाचे कार्य असुन मनोरंजन सुद्धा या नाटकाच्या माध्यमातुन होत असते. नाटकाचा उदबोधन घेऊन चांगले कार्य केले पाहिजे. असे प्रतिपादन या प्रसंगी केले.यावेळी नाटकप्रेमी बांधवांना व गावातील जनतेला संबोधित करून नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या*

*याप्रसंगी जिल्हा महामंत्री प्रशांत जी वाघरे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले*.
*यावेळी तालुका महामंत्री लोमेशजी कोलते,अशोकजी तम्मेवार भाजपा कार्यकर्ता, पंकज येवले युवा कार्यकर्ता तसेच अनेक कार्यकर्ते व नाटयप्रेमी उपस्थित होते.*