राजाराम :- सिरोंचा ते आलापली (३५३)राष्ट्रीय महामार्गांवर गुड्डीगुडम बायपास जवळ आलापली कडून कमलापूर कडे जाणारा दुचाकी स्वाराचा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडले आहे.अपघात ग्रस्त रुग्ण वहाब खान वय ३५,मुबंई चे रहिवासी असून त्यांनी जिओ टॉवर कंपनीचे इंजिनियर असून सद्या नागेपली येथे राहत आहे.यात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले आहे. लगेच गुड्डीगुडम चे सामाजिक कार्यकर्ते अनिल पेंदाम यांनी स्वराज्य फाउंडेशन ग्रुप ला रुग्णवाहिके करिता संपर्क करून रुग्णाला उपकेंद्र गुड्डीगुडम येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.स्वराज्य फाउंडेशन ग्रुप आलापली चे रुग्णवाहीका उपलब्ध होताच पुढील उपचारासाठी स्वराज्य फाउंडेशन ग्रुप च्या रुग्णवाहिक ने उपजिल्हा रुग्णालय अहेरी करिता पाठविण्यात आले.