येला (रेगुंठा) येथे रामायणाचे आयोजन*
रेगुंठा:- भारतीयांच्या श्रद्धास्थानी असलेल्या रामायण आणि महाभारत या महान ग्रंथाचे भरपूर वाचक आहेत.मात्र आपल्या गावात प्रत्यक्ष रामायणाचे आयोजन करून बघणे म्हणजे रामायण बद्दल आजही किती क्रेझ आहे हे दिसून येते,असे मत माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी व्यक्त केले.सिरोंचा तालुक्यातील येला (रेगुंठा) येथे रामायणाचे आयोजन करण्यात आले.रामायण अंकाचे उद्घाटन त्यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामायण आयोजन कमेटीचे प्रमुख सुरेश सुंकरी,सुरेश बेझानी,स्वामी पट्टेम,श्रीनिवास पट्टेम,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सिरोंचा तालुकाध्यक्ष श्रीनिवास कडार्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सत्यनारायण परपटला, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वेंकटलक्ष्मी अरवेली तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
आजच्या मॉडर्न युगात त्रिडी सिनेमा, लाईव्ह मॅच,विविध प्रकारचे सिरीयल बघितले जातात.बरेचजण तर मोबाईल गेम मध्ये व्यस्त असतात.मात्र,गावात रामायणाचे आयोजन केल्याने नवीन पिढीला रामायण काय आहे हे कळणार आहे.एका दिवसात संपूर्ण रामायण दाखवणे शक्य नसले तरी विविध भूमिकेतून त्याचा गाभा लोकांना कळणार असल्याचे त्यांनी म्हटले.
येला (रेगुंठा) गावात सोमवारी रात्रीच्या सुमारास रामायण अंकाचे आयोजन करण्यात आले.विशेष म्हणजे रामायण मधील विविध भूमिका हे गावकऱ्यांनीच साकारले होते.यासाठी गावकऱ्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती.उद्घाटनप्रसंगी गावात पोहोचताच गावातील नागरिकांनी पुष्पगच्छ देऊन भाग्यश्री ताई आत्राम यांचे स्वागत केले.प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून रामायण अंकाचे सुरुवात करण्यात आले.यावेळी रामायण पाहण्यासाठी परिसरातील विविध गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.