टेकडा (ताला )येथे विहिप, बजरंग दल शाखेची स्थापना

58

टेकडा (ताला):- विश्व हिंदू परिषद प्रेरित बजरंग दल अहेरी जिल्हा अंतर्गत सिरोंचा प्रखंड  मध्ये येत असलेल्या टेकडा (ताला) येथील स्थानिक हनुमान मंदिरात अहेरी जिल्हामंत्री अमित बेझलवार यांच्या मार्गदर्शनाखाली बैटक घेऊन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल शाखेचे स्थापना करण्यात आली आहे.
  टेकडा येथील युवकांना विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे स्थापना, कार्य, उद्देश, व परिषदाचे ब्रीद वाक्य सेवा,संस्कार सुरक्षा  आणि सामाजिक, धार्मिक, हिंदू संस्कृती, देशावर होणारे अत्याचार, गोसेवा असे विविध माहिती जिल्हामंत्री अमित बेझलवार यांनी अवगत करून दिले. या वेळी जिल्हा सहमंत्री सामन्ना ओल्लाला,सहमंत्री रमेश बामनकर, धर्मजागरण प्रमुख संतोष चंदावार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे मधु परपटलावार, प्रभाकर परपटलावार, राजेश मानेमवार, रेगुंठा बजरंग दल संयोजक राकेश बिरदु, रंगय्यापली चे संयोजक संतोष अडेट्टी,स्वप्नील पेद्दीवार,किरण पेद्दीवार सह टेकडा येथील मोठया प्रमाणात बजरंगी युवक उपस्थित राहून मोठ्या उत्साहित संपन्न करण्यात आले.