गडचिरोली – – गोंडवाना विद्यापिठ गडचिरोली येथील सभागृहास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते दत्ताजी डिहोळकर यांचे नाव दिल्यामुळे आदिवासी बांधवाच्या भावना दुखावल्या त्यामुळे आदिवासी सामाजीक कार्यकर्ते वसंतराव कुलसंगे हे येत्या २६ जानेवारी पासुन विद्यापिठाच्या समोर उपोषणाला बसणार आहेत . त्याचा योग्य न्याय मागणीसाठी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवा नेते प्रशांत श्यामकांत मडावी यांनी उपोषणाला जाहीर पांठिबा दिला असुन ते स्वतः उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे . . विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांनी गोंडवाना विद्यापिठाच्या सभागृहास आदिवासी – क्रांतीकारी थोर पुरुषांचे नाव न देता .आरएसएस च्या व्यक्तीचे नाव दिले . हा जिल्हयातील आदिवासी जनतेचा मोठा अपमान आहे . त्यामुळे आदिवासी सेवक वसंतराव कुलसंगे हे उपोषणाला बसणार आहेत . त्यांचा उपोषणाला गोंडवाना गणतंत्र पार्टीने जाहीर पाठींबा दिला असुन वेळ पडल्यास गोंगपाचे युवा नेते प्रशांत श्यामकांत मडावी हे सुध्या उपोषणाला बसण्याची तयारी दर्शविली आहे .
गोंडवाना विद्यापीठाचा तो ठराव रद्द करा.
त्या उपोषणाला गोंगपाचे जाहीर समर्थन .