#Gadchiroli वसंत कुळसंगे यांच्या उपोषणाला अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने पाठिंबा

56

सभागृहाचा ठराव रद्द होईपर्यंत उपोषण थांबणार नाही.

        

गोंडवाना विद्यापीठातील निर्माणाधीन सभागृहाला आरएसएस चे नेते दत्ता डिडोरकर यांचे नाव देण्याचा विद्यापीठ सिनेटने घेतलेला ठराव तात्काळ रद्द करावा व सदर सभागृहाला राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी गडचिरोली येथील आदिवासी नेते माननीय वसंत जी कुलसंगे यांनी प्रजासत्ताक दिनापासून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे 

विद्यापीठाच्या सिनेटने चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी क्रांतिकारक व समाजसेवकाकडे बुद्धी परस्पर दुर्लक्ष करून या दोन्ही जिल्ह्याचा शैक्षणिक क्षेत्राशी किंवा विद्यापीठाची तीळ मात्र ही संबंध नसणाऱ्या दत्ता डिडोरकर याचा नाव देण्याचा एकतर्फी व घाई घाईने निर्णय घेतला

या निर्णयाच्या विरोधात गडचिरोली जिल्ह्यातील विविध सामाजिक राजकीय संघटनांनी आक्षेप घेऊन सिनेट ठरावाचा विरोध नोंदवला
या आंदोलनाला समाजातील विविध स्तरातून व्यापक पाठिंबा मिळत असतानाच आदिवासी समाजातील ज्येष्ठ नेते वसंतराव कुलसंगे यांनी दिडोळकरांच्या नावाचा ठराव रद्द करावा या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत
आज या उपोषण स्थळी राजकीय पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन या उपोषणाला आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला

 व सदर ठराव रद्द करण्याची जोरदार मागणी केली. यातच अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदेने कुलसंगे यांच्या उपोषणाला भेट घेऊन पाठिंबा

दर्शिवला आहे. यावेळेस अखिल भारतीय आदिवासी  विकास युवा परिषद,गडचिरोलीचे  विनोद मडावी,कुणाल कोवे, बादल मडावी, लोकेश मडावी,डेव्हिड पेंदाम, रुपेश सलामे, उपस्थित होते.

दि. 27 जाने 2023
गडचिरोली