#Danapur दानापूर येथिल दिव्या हागे व रामेश्वर अरबे ने घेतली राज्यस्तरावर झेप

64

पुणे येथे करणार विभागाचे नेतृत्व   एकाच विद्यालयातील दोन विद्यार्थी राज्यस्तरावर
जितेंद्र लखोटीया 
तेल्हारा तालुका ,प्रतिनिधी
तेल्हारा: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत यवतमाळ येथे आयोजित 17  वर्षाखालील शालेय अथेलेटिक्स स्पर्धेत दिव्या प्रमोद हागे हिने 17 वर्षा आतील मुलींमध्ये तिहेरी उडी या
क्रीडा प्रकारात 8.76 मीटर उडी मारून सुवर्णपदकसह राज्यस्तरवर तर अमरावती येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा 2023 च्या अथेलेटिक्स स्पर्धेत 14 वर्षाआतील वयोगटात रामेश्वर अरबे ह्याने 5.11 मीटर लांब उडी मारत सुवर्णपदक मिळवले आहे. त्यामुळे तेल्हारा तालुक्याच्या 
शिरपेचात  मनाचा तुरा खोवला आहे.दिव्या व रामेश्वर येथिल हनुमान प्रसाद साह जनता विद्यालया चे खेळाडू विद्यार्थी असून  दिव्या वर्ग दहा मध्ये तर रामेश्वर वर्ग 9 मध्ये  शिकत आहे.नुकत्याच यवतमाळ व अमरावती  येथे झालेल्या या स्पर्धेत यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम या जिल्ह्यातील खेळाडू विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता
. यामध्ये हनुमान प्रसाद साह जनता विद्यालय दानापूर ची दिव्या प्रमोद हागे, व रामेश्वर देवानंद अरबे  ह्या दोघांनी अतिशय  कठीण परिश्रम व जिद्द व चिकाटीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला व आपले नाव सुवर्ण पदकावर अंकित केले.
विभागीय स्तरावर झेप घेतल्या नंतर दिव्या , रामेश्वर आता पुणे येथिल शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत विभागाचे नेतृत्व करणार आहे.
दोघांच्या या यशाबद्दल विघालयाचे व्यवस्थापक डॉ, अजेय विखे, मुख्यध्यापक श्रीराम डाबरे , परिवेक्षक विलास गावंडे,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिव्याचे अभिनंदन करून पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या आहेत.दिव्या व रामेश्वर या त्यांच्या यशाचे श्रेय तिचे आई-वडील तसेच क्रीडा मार्गदर्शक नितीन मंगळे यांना देते.विशेष म्हणजे रामेश्वर हा U-14 वयोगटात खेळत असल्यामुळे क्रिडा प्रबोधिनीत थेट प्रवेशापासून फक्त एक पाऊल मागे आहे,जर राज्यस्तरीय स्पर्धेत त्याची सुवर्ण कामगिरी झाली तर क्रीडाप्रबोधिनी महाराष्ट्र शासन त्याचे खेळा सोबतच या पुढील शिक्षणाचा सम्पूर्ण भार उचलणार आहे.
प्रतिक्रिया-
१.या विघालयाची ओळख म्हणजे जागतिक धावपटू अर्चना अढाव हिने सुवर्णपदक, कास्यपदक व  विविध स्पर्धेत यश मिळवले आहे. तिच्या पावलांवर पाऊल ठेवत दिव्या व रामेश्वर ने   आमच्या विघालयाचे नाव उंचावले याचा आम्हां सर्वांना  आहे.
डॉ, अजेय विखे-
व्यवस्थापक हनुमान प्रसाद साह जनता विद्यालय दानापूर.
२.या दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाचा आम्हाला सार्थ अभिमान असून राज्यस्तरावर सुद्धा दोघेही चांगली कामगिरी करतील असा विद्यालयला विश्वास आहे.
श्रीराम डाबरे.
मुख्याध्यापक, हनुमान प्रसाद साह जनता विद्यालय दानापूर.