वेलतूर तुकूम ता. चामोर्शी येथे महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते डे- नाईट कबड्डी स्पर्धेचे उदघाट्न, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. नामदेव किरसान यांचे सह अनेक मान्यवरांची उपस्थितीती
गडचिरोली:- सेवन स्टार क्रिकेट क्लब वेलतुर तुकून तालुका चामोर्शी यांच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते पार पडले अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉक्टर नामदेव किरसान, विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव विश्वजीत कोवासे तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद भगत, उपस्थित होते.
मोबाईल आणि संगणकाच्या अतिवापरामुळे युवकांचे मैदानी खेळापासून दुर्लक्ष होत चालले आहे, त्यामुळे युवकांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होत असून युवकांनी आपल्या निरोगी व सुदृढ आयुष्याकरिता रोज थोडावेळ मैदानी खेळाकरिता दिला पाहिजे असे मार्गदर्शन जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी युवकांना केले.
कबड्डी आणि खो-खो सारख्या स्वदेशी खेळांचे आयोजन फक्त विरंगुळा म्हणून न करता त्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितले पाहिजे. जेणेकरून ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना पुढे राष्ट्रीय स्तरावर व आंतरराष्ट्रीय स्तरावर अथवा लीग मॅचेस मध्ये खेळण्याची संधी मिळेल व त्यांचे भविष्य उज्वल होईल. असे मत डॉक्टर कीरसान यांनी व्यक्त केले
याप्रसंगी उपसरपंच दिगंबर धानोरकर, सरपंच संध्याताई नायबनकर, मनोजभाऊ पोरटे, रुपेशभाऊ चलाख, ग्राप सदस्य देविदास देशमुख, सुनिताताई पाल, आशा वर्कर उर्मिलाताई धोटे, अंगणवाडी सेविका मालताताई कुलसंगे, छत्रपती धोटे, गंगाधर शेडमाके, राहुल कोहपरे, मंडळाचे सर्व पदाधिकारी व प्रेक्षक उपस्थित होते.







