सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार ठरत आहेत ‘जनतेच्या मनातील राजा’ : समस्या जाणून थेट रस्त्यावर उतरणारा लढवय्या

135

अहेरी : संतोष ताटीकोंडावार हे फक्त एक नाव नाही,तर गडचिरोली जिल्ह्यातील जनसामान्यांचा आधार बनले आहेत.सामाजिक कार्यकर्ते म्हणून राहून संतोषभाऊ जनतेच्या थेट समस्या जाणून घेतात आणि त्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा देतात.

जिल्ह्यात कुठेही अपघात झाला की सर्वात आधी पोहोचणाऱ्यांमध्ये संतोषभाऊंचे नाव असते.जखमींना रुग्णालयात दाखल करणे,रक्ताची व्यवस्था करणे,मृतदेह नातेवाईकांपर्यंत पोहोचवणे यासाठी ते स्वतः पुढाकार घेतात.पोलिस व प्रशासनाकडे पाठपुरावा करून पीडित कुटुंबाला मदत मिळवून देतात.

तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी सिरोंचा-आलापल्ली महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात संतोष ताटीकोंडावार यांनी नागरिकांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन केले.खड्ड्यांमुळे रोज अपघात होत होते,प्रवासी त्रस्त झाले होते.या आंदोलनाची दखल घेत संबंधित विभागाने तात्काळ कामाला सुरुवात केली व जोराने रस्त्याचे काम सुरू केले.जनतेचा आवाज दाबला जाणार नाही, हे त्यांनी दाखवून दिले.

एवढाच नाही तर धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची होणारी अडवणूक, वजनात मारली जाणारी काटामारी, बारदाना तुटवडा याविरोधात संतोषभाऊंनी अनेकवेळा आवाज उठवला.अधिकाऱ्यांना धारेवर धरून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.शेतकऱ्याच्या घामाचे दाम मिळालेच पाहिजे,ही त्यांची भूमिका आहे.

अहेरी उपविभागातील दुर्गम भागातील समस्या तहसील,पोलीस स्टेशन,पंचायत समितीपर्यंत पोहोचवण्याचे काम संतोषभाऊ करतात.वीज,पाणी,रेशन,दवाखाना या मूलभूत सुविधांसाठी ते सातत्याने पाठपुरावा करतात.

*”पद नाही, पण जबाबदारी आहे”*
संतोष ताटीकोंडावार यांच्याकडे कोणतेही राजकीय पद नाही.तरीही जनतेच्या प्रश्नांसाठी 24 तास उपलब्ध असतात.मी नेता नाही, जनतेचा सेवक आहे.माझ्याकडे पद नाही,पण जनतेप्रती जबाबदारी आहे,असे ते नम्रपणे सांगतात.

गरीब, आदिवासी, शेतकरी, कामगार यांच्यासाठी लढणारा, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा संतोष ताटीकोंडावार आज ‘जनतेच्या मनातील राजा’ ठरत आहे.प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणाऱ्या या लढवय्या कार्यकर्त्याला जिल्ह्यातून सलाम केला जात आहे.