अखील भारतीय आदिवासी विकास परिषद, गडचिरोलीची प्रकल्प अधिकारी यांना निवेदनातून मांगणी
गडचिरोली:- कु. कृत्तिका दशरथ पोरेटी वर्ग ३ रा, एकलव्य मॉडेल रेसीडेसीअल पब्लीक स्कुल चामोर्शी स्थीत गडचिरोली येथे शिक्षण घेत होती. दि.२५ मे २०२२ ला तिचा मृत्यू झाल्याने तिला सानुग्रह अनुदान मिळाले नाही, असे तिच्या पालकाने कळविला आहे. ६ महिन्याचा कालावधी लोटूनही सानुग्रह अनुदान मिळाले नसल्याने, अ.भा.आ.वि.प. गडचिरोली युवा जिल्हाध्यक्ष कुनालभाऊ कोवे व पदाधिकाऱ्यांनी
दि.२६-१२-२२ ला आठ ते दहा दिवसात सानुग्रह अनुदान प्राप्त करून द्यावे अशी मागणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांना निवेदनातून केली होती. मात्र अजुनही सानुग्रह अनुदान मिळाले नसल्याने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, गडचिरोलीच्या वतीने पुनच्छ स्मरण पत्राद्वारे कु.कृतीका पोरेटी हिच्या पालकाला तात्काळ सानुग्रह अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे. अन्यथा आपल्या
कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळेस गडचिरोली युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे,दशरथ पोरेटी (पालक),बादल मडावी,डेव्हिड पेंद्राम, रुपेश सलामे,हर्षवर्धन कुलसंगे, सुरज मडावी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.