स्व. वातुजी म. कोहळे यांच्या 27 व्या पुण्यतिथी निमित्त ग्रामजागर आणि गोपाळकाल्याच्या माध्यमातून राजनगट्टा नगरी दुमदुमली

45

जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते  दहीहंडी फोडून कार्यक्रमाचा समारोप

गडचिरोली:- चामोर्शी तालुक्यातील राजनगठ्ठा येथे ह. भ.प. भागवतकार स्व. वातूजी महाराज कोहळे व गीताआई कोहळे यांच्या 27 व्या पुण्यतिथी तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे 54 वी पुण्यतिथी निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सर्व सांप्रदायिक दत्त मंदिर राजनगट्टा येथे ग्राम प्रबोधन व गोपाळ काल्याचे आयोजन करण्यात आले होते.
दोन दिवशीय या कार्यक्रमात पहिल्या दिवशी दत्तात्रय क्षीरसागर महाराज उराडी यांच्या हस्ते घटस्थापना व द्वीप प्रज्वलन करून रात्री सामूहिक हरिपाठ,भजन कीर्तन आणि जागरणाचे कार्यक्रम पार पडले.  दुसऱ्या दिवशी सकाळी राजनगट्टा गावातून ग्राम दिंडीच्या माध्यमातून व लोकसहभागातून ग्रामस्वच्छता व प्रबोधन कार्यक्रम झाले यावेळी संपूर्ण राजनगट्टा गावात स्वच्छता अंगन सडासारवण व रांगोळ्यांनी सुशोभित करण्याची परंपरा या वर्षी देखील कायम ठेवण्यात आल्याने अखे गाव भक्तीमय सागरात बुडाल्याचे वातावरण निर्माण झाले होते. राजनगट्टा,  वालसरा, कुंभारवाही, आमगाव, भिवापूर, रेखेगाव यांच्या सामूहिक भजनातून प्रबोधन कार्यक्रम व गोपाळकाला कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. 
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते  दहीहंडी फोडून ह. भ.प. दत्तात्रय क्षीरसागर महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनात कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. क्षीरसागर महाराजांनी अध्यात्मा सोबतच मानवाने निरोगी राहण्याकरिता नशा मुक्तीचा मार्ग अवलंबावा याकरिता आपल्या अमृतवाणीतून मार्गदर्शन केले.
यावेळी अनुसूचित जाती विभाग काँग्रेस अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, हरबाजी मोरे, ह.भ.प. माधव महाराज चौधरी कार्तिक कोकडे, सरपंच वालसरा अरुण मडावी, भाजपा नेते जयराम चलाख, कार्यक्रमाचे आयोजक वसंत कोहळे, लोमेश सातपुते, माजी पो.पा. भाऊजी चलाख, बाबुराव भांडेकर,  प्रकाश चीचघरे, अतुल बुरांडे, गोकुळदास कोहळे, वासुदेव दूधबावरे, भाऊजी सोमनकर, श्रीराम सातपुते, संदीप कोपुलवार, बाजीराव कोटनाके, सिताराम भांडेकर प्रभाकर कोपुलवार, हरिभाऊ पोहनकर, रमेश शिडाम, अनुप कोहळे  सह मोठ्या संख्येने परिसरातील भाविक भक्तगणांनी या सोहळ्यास उपस्थित राहून महाप्रसादाचा आस्वाद घेतले.