एटापल्ली…तालुक्यातील ताटीगुंडम येथे जय सेवा क्रिकेट मंडळाकडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.
या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके,श्रीकांत चिप्पावार आवीस तालुका उपाध्यक्ष,रमेश तोरे माजी पं. सं. सदस्य, बाळू आत्राम उपसरपंच ग्रा. पं. गुरुपल्ली, शेवंताबाई वेलादी पोलीस पाटील,माधव गावडे,रमेश भोयर सर, बाजीराव आत्राम, सत्तू गावडे, गावडे सर,बाजीराव आत्राम सेवानिवृत्त शिक्षक, गाव भूमिया वलसा आलाम,निरवाजी गावडे माजी पोलीस पाटील,खालगो जी प्रतिष्टीत नागरिक,खय्युम भाई,विनोद कावेरी,जुलेख शेख सह आविस पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी टेनिस बॉल क्रिकेट विषयी उपस्थित खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
क्रिकेट सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून असे एकूण तीन बक्षीस ठेवण्यात आले.
जय सेवा क्रिकेट मंडळा कडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रमेश तोरे यांनी मानले.या क्रिकेट सामन्याचे उदघाटनीय सोहळ्याला ताटीगुंडम व पंदेवाही येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.