# Armori आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरांसह तालुक्यातील नागरिकांच्या प्रमुख मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

48

हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती-

आरमोरी – गडचिरोली जिल्हयातील आरमोरी तालुका हा प्रगतशील तालुका असला तरी तालुक्यातील नागरिक, भूमिहीन, शेतकरी महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिक विविध

 समस्यांशी त्रस्त असुन  नागरीकाच्या शहरांसह तालुक्यातील प्रमुख मागण्यांच्या न्याय हक्कासाठी आजच्या मोर्चातुन आरमोरी शहरातील हृदवाढ झालेल्या जमिनीच्या आखीव पत्रीका भोगवट दाराच्या नावे देण्यात यावे, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे भारनियमन बंद करण्यात यावे,गरजु लाभार्थ्यांना तात्काळ घरकुल देण्यात यावे,

 प्रधान मंत्री,रमाई,शबरी घरकुल योजनेच्या लाभार्थ्याचे हप्ते तात्काळ देण्यात यावे,आरमोरी शरहात ओपन स्पेससाठी जागा न सोडता शेतीच्या जमिनीवर सरसकट लेआऊट पाडून विक्री सुरू असल्याने त्यांची चौकशी करून त्यावर बंदी करण्यात यावी, वघाळा ग्रामपंचायत हद्दीतील अल्पभूधारक 35 अतिक्रमण जागा भोगवटदारावर कोणतीही शासकीय आकारणी न घेता शासनाने निःशुल्क मोफत  जागेचे पट्टे देण्यात यावे,आरमोरी नगर परीषदला नविन पाणी पुरवठा योजना मंजूर करावे, पांदन रस्त्यांना विआर नंबर देवून मजबुतीकरण करण्यात यावे,विज विरतरन कंपनीने मिटर रिडींग करून कृषी पंपाचे बिले देण्यात यावे,विज ग्राहकांवर 37 टक्के विज दरवाढीचा प्रस्ताव तातडीने रद्द करण्यात यावे,

 १३००० हजार धडक सिंचन विहीर योजनेतील कार्यारंभ आदेश दिलेल्या शेतकऱ्यांना बांधकामासाठी अनुदान देयात यावे, तालुक्यातील विविध  शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरण्यात यावे, आरमोरी येथे १०० खाटाचा दवाखाना मंजूर करण्यात यावा, बुरड कामगारांना वनविभागाने हिरव्या बांबूचा पुरवठा करण्यात यावा,आरमोरी येथील रामसागराचे खोलीकरण व सौदयी करण करणे, वन जमिनीवर अतिक्रमण केलेल्या धारकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे,तसेच दोन तिन वर्षांपासून प्रशासनाकडे प्रलंबित असलेले 

वनपट्टे तातडीने निकाली काढण्यात यावे,गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित कृषी पंप साठी डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यात यावे, जंगली हत्ती मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावे, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी पर्यटन स्थळाचा विकास करावा, वनावर आधारित रोजगार निर्मितीसाठी ठिकठिकाणी कुटीर उद्योग सुरू करण्यात यावे,या प्रमुख मागण्यांच्यासाठी आज दिनांक 13 फरवरीला हजारोंच्या संख्येने आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम  यांच्या नेतृत्वात शहरांसह तालुक्यातील नागरिकांच्या प्रमुख मागण्यांच्यासाठी तहसीलदार कार्यालयावर धडकला आरमोरीचे तहसीलदार कल्याण कुमार दहाट यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे निवेदन देण्यात आले.
यावेळी मोर्चाला उपस्थित गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,माजी आमदार आनंदराव गेडाम,गडचिरोली जिल्हा काँग्रेस प्रभारी डॉ नामदेवराव किरसान,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ नितीनजी कोडवते, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव विश्वजीत कोवासे, वामनराव सावसागडे, गडचिरोली जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती अध्यक्ष रजनीकांत मोटघरे,राजु गारोदे,गडचिरोली जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा वृंदादाताई गजभिये,आरमोरी शहर महिला काँग्रेस अध्यक्षा नगरसेवीका निर्मलाताई किरमे,नगरसेवीका दुर्गा लोनारे,आनंदराव आकरे मधुकर दोनाडकर,छगन सडमाके,जोती सोनकुसरे, आरमोरी शहर काँग्रेस अध्यक्ष शालिक पत्रे,दिवाकर पोटफोडे, अशोक माकडे,विश्वेश्वर दरो, दतु सोमनकर,माजी पंचायत समिती उपसभापती विनोद बावनकर, प्रा.शशिकांत गेडाम,तुकाराम वैरकर,विजय सुपारे,विजय चाटे, राहुल धाईत, गोलु भोयर, स्वनिल ताडाम,राजकुमार नंदरधने,युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अंकुश गाढवे,रामभाऊ हस्तक,निता हेडावु,विद्या सपाटे,गिरीधर नन्नावरे, यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.
या मोर्चाचे आयोजक तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम,जेष्ठ कार्यकर्ते अनिल किरमे,दतुभाऊ सोमनकर यांनी केले.

यात तालुक्यातील हजारोच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती राहील्याने या मोर्चाने इतिहास घडविला हे विशेष.