२५जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान विशेष सिकलसेल तपासणी अभियान

75

उप संपादक: तेजेश गुज्जलवार एटापल्ली

सिकलसेल अ‍ॅनिमिया हा अनुवंशिक व गंभीर रक्तविकार असून त्याचे वेळेत निदान व उपचार होणे अत्यंत आवश्यक आहे. या आजाराच्या प्रभावी नियंत्रणासाठी शासनाच्या वतीने २५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत विशेष सिकलसेल अ‍ॅनिमिया तपासणी व उपचार अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानाअंतर्गत नागरिकांनी आपल्या नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र किंवा शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन सिकलसेल तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांसाठी तपासणी, समुपदेशन व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
गट विकास अधिकारी डॉ. आदिनाथ आंधळे यांनी सर्व नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, स्वतःची व कुटुंबीयांची तपासणी करून वेळेत उपचार घ्यावेत, असे आवाहन केले आहे. तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था व लोकप्रतिनिधींनी परस्पर सहकार्याने हे अभियान यशस्वी करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्वांच्या सहकार्याने सिकलसेल अ‍ॅनिमियामुक्त समाज निर्माण करणे शक्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.