मुख्यसंपादक:सुरेश मोतकुरवार
अहेरी तालुक्यातील मौजा–वट्रा येथील पुलिया उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात पूर्णपणे पाण्याखाली जाते. परिणामी वट्रा गावावरून पुढे जाणाऱ्या दहा ते पंधरा गावांचा संपर्क तुटतो. पावसाच्या दिवसांत नागरिकांना जीव धोक्यात घालून पुलियावरून किंवा पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.
विशेषतः डिलिव्हरी पेशंट, आजारी रुग्ण, विद्यार्थी व अत्यावश्यक कामासाठी ये–जा करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपघाताचीही शक्यता वाढली असून नागरिकांनी पुलिया उंची वाढवून तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.







