भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्लीचे उल्लेखनीय यश सलग दोन वर्ष विभागीय सांस्कृतिक नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविले.

308

एटापल्ली: आदिवासी विभाग अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रिडा स्पर्धा दि.13 ते 15 डिसेंबर दरम्यान चंद्रपुर येथे संपन्न झाले.या स्पर्धांमध्ये एकुण नव प्रकल्पातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.त्यामध्ये चंद्रपुर, भामरागड,अहेरी,गडचिरोली,चिमुर,भंडारा,नागपूर, वर्धा,देवरी येथील एकुण 3000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड येथील 333 खेळाडूंनी सहभाग नोंदविला.या स्पर्धेत भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथील प्राचार्य धनंजय पोटदुखे यांचे मार्गदर्शनाखाली सलग दोन वर्ष सांस्कृतिक नृत्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश मिळविले.यशस्वीतेसाठी प्रा.सविता पोटदुखे,ममता झिलपे प्रा.प्रशांत सातपुते,प्रा.एन डडमल आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंदानी परिश्रम घेतले.त्याप्रमाणे भामरागड प्रकल्पांनी सलग एकोणविस (19) वर्ष चॅम्पियन्सशिप प्राप्त करून उल्लेखनीय कामगिरी केली. यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अमर राऊत सर,सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोषना चव्हाण मॅडम,सहाय्यक प्रकल्प अधिकारी एम.बी.मडावी सर भामरागड यांचे मार्गदर्शन मिळाले.यास्पर्धेचे बक्षीस वितरण नागपूर अप्पर आयुक्त मा.आयुषी सिंह मॅडम हस्ते चॅम्पियन्सशिप ट्रॉफी देऊन विजेत्यांना गौरवांवित केले. भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरी या संस्थेचे सचिव तथा माजी मंत्री,आमदार आदरणीय,धर्मराव बाबा आत्राम साहेबांनी व संस्था अध्यक्षा भाग्यश्रीताई हलगेकर (आत्राम) तसेच प्राचार्य धनंजय पोटदुखे सरांनी विजेत्या स्पर्धेकांचे अभिनंदन केले आहे.