नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, *मा.भाग्यश्री ताई आत्राम*, *शाहीन भाभी हकीम* यांनी *मा.नामदार नरहरी झिरवाळ साहेब* (अन्न व औषध प्रशासन मंत्री) यांची भेट घेतली.

226

आज दिनांक 14/12/2025,

नागपूर: या भेटीत गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी जात पडताळणी विभाग दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करू नये, अशी ठाम मागणी करण्यात आली.
सदर विभाग स्थलांतरित झाल्यास गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास तसेच अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

आदिवासी बांधवांच्या अनेक समस्या असून, त्या समस्या आदिवासीच अधिक प्रभावीपणे समजू शकतात. त्यामुळे या प्रश्नांवर आपण आपल्या स्तरावरून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा व तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

तसेच अहेरी विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांवरही चर्चा झाली.

यावेळी *मा.नामदार नरहरी झिरवाळ साहेब* यांनी सकारात्मक व उत्तम प्रतिसाद दिला.
यावेळी उपस्थित श्रीनिवास वीरगोंनवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, नगरसेवक श्रीनिवास चटारे,
ग्राम पंचायत सदस्य स्वप्नील श्रीरामवार,अनुराग बेझलवार, सुमित मोतकुरवार, कुणाल कन्नमवार, राज मडावी