अहेरी मुख्य रस्ताचे २ वर्षांपासून अपूर्ण २ किमी डांबरीकरण त्वरित सुरु करा.. अन्यथा चक्काजाम आंदोलन करू.. भाजपा पदाधिकाऱ्यांनी PWD ला दिला थेट इशारा.

265

अहेरी शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील केवळ २ किलोमीटरचे डांबरीकरण गेल्या दोन वर्षांपासून अपूर्ण राहिल्याने जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, गल्लोगल्ली खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि वाढत्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या अहेरी येथील पदाधिकाऱ्यांनी काल (मंगळवार) सार्वजनिक बांधकाम विभाग, PWD आलापल्ली कार्यालयात धडक देत सदर रस्ताचे काम त्वरित सुरू करण्याचा ठाम इशारा दिला आहे, PWD प्रशासनाने काम त्वरित सुरू न केल्यास येत्या शनिवारी 6 डिसेंबर रोजी मुख्य चौकात *”भव्य चक्काजाम आंदोलन'”* छेडण्याचा कठोर इशारा भाजपा पदाधिकार्यानी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित रव्वा ह्यांना एक निवेदन देऊन दिला आहे, ह्यावेळी उपविभागीय अभियंता रवीकिरण पारेलवार, अभियंता नागेश आडेपवार हे ही उपस्थित होते..!!
अहेरी शहराच्या मुख्य रस्त्यावरील डांबरीकरणाचे काम तब्बल दोन वर्षांपूर्वी आमदार धर्मराव बाबा आत्राम ह्यांनी भूमिपूजन करून सुरू केले, मात्र त्यानंतर ते थातुरमातूर काम करीत वारंवार थांबवण्यात आले. या अर्धवट कामामुळे नागरिकांची तसेच वाहनधारकांची अक्षरशः पिळवणूक होत आहे, व्यापाऱ्यांचा दुकानात वारंवार धुळ येत असल्याने ते हैराण झाले आहे, मुख्य रस्ता खराब असल्याने शहरातील अंतर्गत मार्गांवरही खड्डे पडून वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे, रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे..!!
अहेरी शहरात रस्त्याची दुरावस्था आणि अपूर्ण काम यामुळे किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे, जनतेचा हा त्रास सातत्याने वाढत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन मागील दोन वर्षांपासून चालढकल करीत राहिल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तसेच त्वरित काम चालू न केल्यास शनिवारी चक्काजाम आंदोलन करण्याचा थेट इशारा दिला आहे, ह्यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार, तालुकाध्यक्ष विकास तोडसाम सहीत संजय अलोने – भाजप उपसरपंच, अमोल गुडेल्लीवार — भाजप नगरसेवक, मुकेश नामेवार — भाजप शहर अध्यक्ष, शालिनीताई पोहनेकर — भाजप नगरसेविका, विकास उईके — भाजप नगरसेवक, सुचित कोडेलवार — भाजप युवा मोर्चा जिल्हा सचिव, सरफराज आलम — भाजप अल्पसंख्याक आघाडी, रवी जोरगेलवार, कोमेश सडमेक, निखिल बोंम्मावार, राहुल मठ्ठामी, शैलेश नामेवार सह अहेरी शहरातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.