माहूर /मालेगाव तालुक्यातील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपीला फाशी द्या, युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूर यांची निवेदनाद्वारे मागणी

350

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील एका चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार करून तिची निर्गुतपणे हत्या केली अशा नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूर यांच्याकडून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना माहूर तहसीलदार तहसील कार्यालय माहूर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन माहूर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे असे माहूर चे डी.वाय.एस.पी. किरण भोंडवाने व पो.नि.देविदास चोपडे यांनी निवेदन घेतांना सांगितले घडलेल्या घटनेचा निषेध करत युवा
ग्रामीण पत्रकार संघ माहूर यांनी हे निवेदन दिले आहे निवेदनावर तालुका उपाध्यक्ष समाधान कांबळे सय्यद इसा सहसचिव कुंदन तीवडकर शहराध्यक्ष संजय वडस्कर सदस्य यांच्या निवेदनावर सह्या आहेत.