जोगीसाखरा – आरमोरी तालुक्यातील जोगी साखरा गट ग्रामपंचायत हद्दीतील सालमारा येथे दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात भिषण पाणी टंचाई जाणवत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने शासनाकडे सालमारा गावांसाठी नवीन पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून प्रस्ताव सादर केला होता.याची दखल घेऊन शासनाने जलजिवन
मिशन अंतर्गत २५ लाख रुपये निधी मंजूर करून आज जोगीसाखरा ग्रामपंचायत चे सरपंच संदिप ठाकुर यांच्या हस्ते सालमारा येथे नविन पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे भुमिपुजन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीपभाऊ घोडाम,ग्रा.प.सदस्य स्वनिल गरफडे,बकाराम नारनवरे, गंगाधर कुमरे,देविदास रदिये,लक्ष्मण मेश्राम,श्रावण कोलते,
संजय कुमरे,तुळशिदास घरत,सुभाष वाघ,महेश वाघ, अजय कुमरे,बालाजी वाकडे मनोज वाघ,काशिनाथ नारनवरे, प्रमोद घरत,उमाजी नारनवरे, बाळकृष्ण वाकडे,विनोद घरत माधव नारनवरे,विकास भोयर, देवेंद्र कुमरे, किर्तीलाल कुमरे, विक्रम नारनवरे,रोहीत रायशिडाम, माणिक कुमरे,साजन मानकर देवराव वाकडे मनोहर मुळे,कालीदास वाकडे,कल्पना नारनवरे यांच्यासह इतर नागरीक उपस्थित होते.