भाग्यश्रीताई आत्राम* *जीमलगट्टा–देचलीपेठा निर्वाचन क्षेत्रात उमेदवारीची दाट शक्यता कार्यकर्त्यांची पहिली पसंती, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद — “अबकी बार ताई

588

जिल्हा परिषद *जीमलगट्टा–देचलीपेठा* निर्वाचन गटातील ग्राम पंचायत देचली, पेठा, कोजेड, कीष्टापूर दौड, जीमलगट्टा आणि वेडमपल्ली येथे *मा.भाग्यश्री ताई आत्राम* यांच्या उपस्थितीत सभा आयोजित करण्यात आल्या.

पेठा येथील सभेमध्ये एकच घोषणांचा गजर झाला —

*“अबकी बार ताई साहेब!” “ताई साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं!”*

सर्व ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी एकमुखाने *ताई साहेबांना* जिल्हा परिषद क्षेत्रातून प्रतिनिधित्व करावे आणि नेतृत्व स्वीकारावे, अशी ठाम मागणी केली.

“जिल्हा परिषद *जीमलगट्टा–देचलीपेठा* निर्वाचन क्षेत्रातील जनतेची मागणी आणि कार्यकर्त्यांचा हट्ट *मा. भाग्यश्री ताई आत्राम* यांनी जी.प. क्षेत्रातून प्रतिनिधित्व करावे, या मागणीला जोर चढला आहे.”

सभेमधून *ताईंच्या* नेतृत्वावर जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा भक्कम विश्वास स्पष्टपणे दिसून आला. अनेक कार्यकर्ते विविध पक्षांतून बाहेर पडून ताईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्या सोबत येण्याची तयारी दर्शवत आहेत.

उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांनी *ताईंना* आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, *जीमलगट्टा–देचलीपेठा* निर्वाचन क्षेत्रातून *मा.भाग्यश्री ताई आत्राम* यांच्या उमेदवारीची दाट शक्यता व्यक्त केली जात असून, ही शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.

तथापि, *ताई साहेबांनी* नम्रतेने सांगितले —

“मीच उमेदवार असणे गरजेचे नाही. माझ्यासाठी मनापासून काम करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी माझी इच्छा आहे.”

तरीदेखील, कार्यकर्त्यांच्या मनात एकच निश्चय दृढ झालेला दिसतो — 💫 *“अब की बार, ताई साहेब!”*