पळसगाव अरततोंडी पहाडी वरील ज्ञानयज्ञ सप्ताहासाठी गावागावातुन स्वयंस्फूर्तीने दिली जाते लोक वर्गणी व सीधा*

43

*आज होणार महाशिवरात्रीच्या यात्रेचे समारोप*

जोगीसाखरा – आरमोरी तालुक्यातील शासनाचा पर्यटनाचे  क दर्जा मिळालेला पळसगाव अरततोंडी पहाडीवर बसलेल्या शंकर महादेवाच्या भाविक भक्तांनी भागवत महायज्ञ सप्ताह गोपाल काला यशस्वीपणे पार पाडण्यासाठि परिसरातील प्रत्येक गावागावात व चौकाचौकात पावती बुकद्वारे आर्थिक सहाय्य व तांदुळ, डाळ, तिखट,कांदा व इतर स्वयंपाक साहित्य स्वयंस्फूर्तीने गोळा करून काल्यासाठी भक्तजनांच्या सेवेत महादेवाच्या चरणी पोहचता केला आहे.हे भगवंता प्रति भक्तांचे प्रेम समाजात आदर्श निर्माण करू पाहत आहे.महादेवगड पहाडीवर महाशिवरात्रीला घटस्थापना झाल्यानंतर २० फेब्रुवारीपासून अहमदनगर येथील ह भ प संपुर्णाताई टेंभरे आळंदीकर यांच्या वाणीतून भागवत महायज्ञ सुरू आहे. भक्तिमय वाणीतून श्रीमद भागवत महात्म्य. भक्ती महाराणी चरित्र.प्रल्हाद आख्यान. श्रीकृष्ण जन्मोत्सव.गोवर्धन लीला.रुक्मिणी स्वयंवर.सुदाम भेट परस्थिती. उद्धार व गोपालकाला हे प्रत्येक दिवसातील विषयांकित भागवत महायज्ञ ऐकण्यासाठी फार मोठी प्रचंड गर्दी उसळत आहे. महादेवगड पहाडी परिसरातील पळसगाव, पाथरगोटा, जोगीसाखरा, कासवी अरततोंडी, डोंगरगाव,चिखली,किनाळा मोहटोला, विहीरगाव,तुळसी पुसेगाव परी कोकडी आणि वडसा अर्बन येथील मोठे भाविक- भक्त व्यापारीगण राजकीय व शासकीय व्यक्तिमत्व भाविक भक्त कुटुंबासह तसेच उपस्थित राहून भागवत सप्ताहाला सहकार्य  लाभत आहे.  २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या गोपालकाला कार्यक्रमात कोणत्याही भाविक भक्ताची गैरसोय होणार नाही याकरिता आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली,आरमोरी तहसील कार्यालय,पोलिस स्टेशन देसाईगंज, सज्ज असुन  महादेवगड पहाडी कमिटीने महिला पुरुष भाविक भक्तांच्या हिताचे निर्णय घेण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे. तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन  महादेवगड पहाडी देवस्थानचे अध्यक्ष पुंडलिक घोडाम, उपाध्यक्ष श्रीराम ठाकरे, सचिव गणेश मातेरे यांसह देवस्थान कमिटी पदाधिकारी यांनी केले आहे.