#Gadcholli#गोंडवाना विद्यापीठात ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करून मराठी भाषा गौरव दिन साजरा

96

गोंडवाना  विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक  मराठी विभागाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करून मराठी भाषा गौरव दिन साजरा  करण्यात आला. मराठी विभागाचे समन्वयक डॉ. श्याम खंडारे , संचालक क्रीडा विभाग डॉ. अनिता लोखंडे, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. विवेक जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते  कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मागील सात दिवसांपासून विद्यार्थ्यांसाठी कविता आणि कथाकथन यांच्या वाचनाचा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. सविता साधमवार, प्रा. शुभम बुटले , बघमारे, प्रा. शेंडे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थी तसेच प्राध्यापकांनी घेतला.