भाग्यश्री ताईंनी दिली मूकबधिर विद्यार्थ्यांना मायेची ऊब वाढदिवसानिमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांना नवीन स्वेटर चे वाटप स्वच्छता कर्मचाऱ्यांचा शाल देऊन सत्कार

192

आज माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठ च्या सीनेट सदस्या भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) यांच्या आज जन्मदिनानिमित्त अहेरी येथील इंडियन फंक्शन हॉल येथे आयोजित छोटे खाणी कार्यक्रमात एकलव्य मूकबधिर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना मायेची ऊब देत जवळपास ३० विद्यार्थ्यांना नवीन स्वेटर चे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या साईन (हावभाव) भाषेमध्ये भाग्यश्री यांचे आभार मानून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.विशेष म्हणजे समाजातून दुर्लक्षित विद्यार्थ्यांना नवीन स्वेटर मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
याप्रमाणे संपूर्ण शहरातील स्वच्छता करणारे नगर पंचायत अहेरी चे सर्व स्वच्छता कर्मचारी यांना शाल ओढवून त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस (श.प .गट) च्या विभागीय अध्यक्षा शाहीनभाभी हकीम, शोभा मडावी, इमला गावडे, जयश्री चिलवेलवार, जाहीर हकीम,श्रीनिवास विरगोनवार अमोल मुक्कावार, श्रीनिवास भाऊ चटरे