#Bhayyahre#दिव्यांग बंधू-भगिनींनी आलापल्ली येथील शिबारात मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा

58

माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचे आवाहन







अहेरी:तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,आलापल्ली येथे 09 मार्च रोजी ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना ऑनलाइन प्रमाणपत्र मिळवून देण्याकरिता दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. करिता दिव्यांग बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील दिव्यांग प्रमाणपत्र मंडळातील तज्ञ डॉक्टर्सच्या सहकार्याने व मिशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड ॲक्शन (मित्र) यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहीम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात 18 ठिकाणी दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान शिबिराचे आयोजन केले आहे. नुकतेच अहेरी विधानसभेतील मुलचेरा तालुक्यात सदर शिबिर संपन्न झाला असून येत्या 9 मार्च रोजी अल्लापल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबिर घेण्यात येत आहे. करिता अहेरी

 तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांग बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले आहे.