#Ajaykakdalwar#रेपनपली येते भव्य व्हालीबाल सामन्याचे उदघाटन

58

माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते.

रेपनपल्ली:अहेरी तालुक्यातील रेपनपली येथे पोचम्मा क्रिडा मंडळ च्या वतिने आयोजित भव्य व्हलिबाल सामन्यांच्या उदघाटन प्रसंगी उदघाटन स्थानावरून  बोलत होते,बोलताना म्हणाले आज ग्रामीण असो किंवा शहरी असो प्रत्येक ठिकाणी व्हलिबाल, क्रिकेट,कबड्डी स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहेत प्रत्येक ठिकाणी माझ्या स्वतः कडून व आदिवासी विध्यार्थी संघाकडून पारितोषिक देत असताना आम्हाच्या  एकच उद्देश्य आहे.युवकांना खेळण्यासाठी एक व्यासपीठ तयार झाले पाहिजे व एक चांगल खेळाडू तयार झाले पाहिजे तेव्हाच तर आपल्या गावाच्या व तालुक्याच्या नावलौकीक होत असतो.हे होत असताना गावातीला सामाजिक,शैक्षणिक,व विकासाबाबतीत चर्चा घडून येत असते व समस्याच्या निराकरण होत असते मात्र आजच खंत वाटते यासाठी शासनाकडुन युवकांना व्यासपीठ मिळत नसते  असे मत यावेळी व्यक्त  केले.

यावेळी माजी सभापती श्री.भास्कर तलांडे यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले खेळाडूंनी त्यांच्यात असलेले सुप्त गुणांना वाव द्यावे,व पंचांनी योग्य निर्णय देवून सदर स्पर्धा खेळिमेळीचे वातावरणात पार पाडवी असे मार्गदर्शन केले.या स्पर्धा मध्ये प्रथम पुरस्कार २१,००० हजार रुपये, दितीय १५,००० हजार रुपये ,तर तृतीय ११,००० हजार रुपये,असे याठिकानी पारितोषिक देण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाच्या उदघाटक म्हणून  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार होते,तर  अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद् सदस्य श्री.अजय नैताम,पंचायत समितीचे माजी सभापती सौ.सुरेखा आलाम,रेपनपलीचे सरपंचा सौ.लक्ष्मी मडावी, श्रीनिवास पेंदाम सरपंच कमलापूर,सचिन ओलेट्टीवार उपसरपंच,सौ.छाया सड़मेक, ग्रा.पं.सदस्या,लक्ष्मण कोडापे ग्रा.पं सदस्य रेपणपली,प्रणाली मडावी, इंदुताई पेंदाम ग्रा.पं सदस्य, इंदारामचे माजी सरपंच,तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य श्री.गुलाबराव सोयाम,माजी सरपंच लक्ष्मण येलम,कमलाताई गावडे,रूख्मा गेडाम,गंगाराम मडावी,आडगोपुलवार साहेब,आविस कार्यकर्ते संतोष सिडाम, राकेश सडमेक, रवि भोयर,बाजीराव आत्राम,श्रीनिवास सिडाम,सीताराम गावडे,दुर्गा सिडाम,बंडु सड़मेक,विलास सिडाम,सुरेश येलम,दिवाकर आलाम,प्रकाश दुर्गे,  वासुदेव सिडाम, आदि मंचावर होते.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष शिवराज सिडाम,सत्यम आत्राम,तिरुपती सिडाम,महेश कोडापे,नरेश सिडाम,गणेश गावडे,व  मंडळाचे सदस्य व गावांतील महिला पुरुष उपस्थीत होते..