राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तर्फे जाहीर निषेध

98

प्रतिनिधी//

भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार मा.जयंत पाटील साहेब व स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्याबद्दल अवमानकारक अपशब्द उच्चारले. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.

याविरोधात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा सिनेट सदस्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या मा.भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, नागपूर विभागीय महिला अध्यक्षा मा.शाहीनताई हकीम यांच्या नेतृत्वाखाली अहेरी येथील श्रीमंत स्व. विश्वेश्वरराव महाराज चौकात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी अहेरी येथील जहीर हकीम साहेब, तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, ग्रामपंचायत सदस्य सालय्या कंबलवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, सुमित मोतकुरवार, संतोष येमुलवार, शैलेश गेडाम, अब्दुल रहेमान, अब्दुल शेख, तुषार पारेलीवार, अनुराग बेझलवार, संदीप गुम्मुलवार, धनंजय मंथनवार, श्रीधर मिश्री, गीता दुर्गे, समृद्धी चिमरालवार, हिना सुनातकर, ओनिमा पुंगाठी, रंजना कौशी, छाया तलांडे, कविता तलांडे, संध्या मुंगमुळे, प्रतिमा चिलमवार, विमला गावडे, शैला पठाण, शमिना शेख, सुवर्णा कांबळे तसेच अहेरीतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित कार्यकर्त्यांनी “गोपीचंद पडळकर मुर्दाबाद”, “जयंत पाटील साहेबांना मानाचा मुजरा” अशा घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.