#Armori#भगवानपुर ग्रा.प मधील हजेरीपट माहिती प्रणाली तिन वर्षांपासून प्रलंबित असल्याने मंजुर रोजगारापासुन वंचित

54

तात्काळ एम आय एस प्रणाली सुरू करा अन्यथा तिव्र आंदोलन करणार गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात नागरिकांचा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन.






आरमोरी :- गावाचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून शासनाने गावाच्या लोकसंख्येवर ग्रामपंचायत चे विभाजन करून नवीन ग्रामपंचायती अस्तिवात आनल्या यात कुरखेडा तालुक्यातील भगवानपुर वाढोना गाव सावलखेडा ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट होते.परंतु त्या गट ग्रामपंचायत हद्दीतील नागरीकांचा   पाहीजेत तसा विकास झाला नसल्यामुळे बरेच वर्षांपासून नागरीकानी दोन गावांसाठी 

भगवानपुर वाढोना  आदिवासी बहुल गावाला सावलखेडा ग्रामपंचायत मधुन कमी करुन भगवानपुर  गावाला स्वतंत्र गट ग्रामपंचायतचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न केले यात गेल्या तिन वर्षापूर्वी भगवानपूर गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत देण्यात आली परंतु भगवानपुर ग्रा.प मधील हजेरीपट माहिती प्रणाली प्रलंबित असल्याने ग्रामपंचायत हद्दीतील रोजगार हमी योजनेचे कामे घरकुल योजना रस्ते नाली बांधकाम विहीर बांधकाम शेतकऱ्यांच्या मजगीचे कामे बंद असल्याने येथील विकास खुंटला असुन मंजुराना  रोजगार उपलब्ध नसल्याने येथील नागरीक आर्थिक अडचणीत सापडले 

 असल्याची समस्या गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम भगवानपुर गावाला भेट दिली असता सांगितले . याची दखल घेऊन शासनाने भगवानपुर ग्रामपंचायत मधील हजेरी पट माहिती प्रणाली तात्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा तिव्र आंदोलन करणार असा इशारा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात नागरीकानी  मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन दिला आहे.

यावेळी शेषराव काटेंगे,सदरु तुलावी,जयदेव उसेंडी,उदाराम उसेंडी,सदाराम काटेगे,विश्वनाथ उसेंडी,प्रभु काटेगे,सुरेश तुलावी, हिवराज कोल्हे,आबाजी तुलावी, पांडुरंग दुमाने,रामदास कोल्हे कमलेश उसेंडी,अनिल कुमोटी आदि उपस्थित होते.