प्रतिनिधी//
गडचिरोली :- जिल्ह्यातील आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात सदैव खंबीर पणे उभी असणारी, समाजातील महत्वाच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आदिवासी एकता युवा समितीच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अमोल कुळमेथे यांची एकमताने निवड करण्यात आली,
मागील अनेक वर्षापासून आदिवासी एकता युवा समिती ही समाजातील अनेक प्रश्न सरकार दरबारी लावण्याचे काम करत आहे. या समितीच्या माध्यमातून अनेक समाज बांधवांचे तसेच ईतर समाजाचे प्रश्न सुद्धा सुटलेले आहेत व त्यांना न्याय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका ही आदिवासी एकता युवा समितीची राहलेली आहे. अमोल कुळमेथे यांची समाजाप्रती असलेली तळमळ व त्यांच्या सामाजिक कार्यची दखल घेत आदिवासी एकता युवा समितीच्या जिल्हाध्यक्ष पदी त्यांची निवड करण्यात आली. सोबतच समितीच्या सचिव पदी प्रदीप कुळसंगे यांची निवड करण्यात आला. जिल्हा उपाध्यक्ष पदी सुधीर मसराम, कोषाध्यक्ष पदी मंगेश नैताम, सहसचिव पदी गिरीश उईके, सल्लागार पदी मुकुंदा मेश्राम व प्रियदर्शन मडावी, तसेच संघटक पदी संजय मेश्राम, संजय उईके, माणिक गेडाम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली…
नव्यानेच जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झालेले अमोल कुळमेथे यांनी कुठल्याही प्रकारचा अन्याय समाज बांधवानावर होऊ देणार अशी ग्वाही दिली.
यावेळी आदिवासी एकता युवा समितीमध्ये नवीन सदस्य सुद्धा समाविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये वासुदेव कोडापे, आकाश कोडापे, योगेश मडावी, प्रफुल कोडापे, प्रवीण कोवे, खुमेंद्र मसराम, निलेश कोडापे, उमेश उईके, रमेश चीकराम, हेमाताई कुळसंगे, सोनियाटेकाम, अन्नपूर्णा मसराम, कीर्तीकुमार उईके यांच्यासह अनेक सदस्यांचा समावेश करण्यात आला.