केंद्र शासनाच्या यादीत समावेश करून राजपत्र प्रसिध्द करण्याची मागणी दक्षिण गडचिरोली मुन्नुर कापेवार –बेलदार समाजाचे मार्गदर्शक रविंद्र भंडारवार यांची मागणी

578

गडचिरोल्ली:
देशातील विविध राज्यांत असलेल्या अनेक जाती-जमातींची वेळोवेळी त्या त्या राज्य मागास वर्गीय आयोगाने प्रस्तावित केल्यानुसार राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाकडून तपासणी व सुनावणी घेऊन केंद्र शासनाच्या इतर मागास प्रवर्गात समाविष्ट करण्याची प्रक्रिया केली जाते.

राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे सन्मानीय अध्यक्ष श्री.हंसराज अहीर व सदस्य भुवन भुषण कमल यांनी दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ व दिनांक २६ जुलै २०२४ ला मुंबई येथे सुनावणी घेतली.त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील 1. Lodh,Lodha,Lodhi , 2.Badgujar, 3.Suryavanshi Gujar , 4.Leve Gujar, Reve Gujar , 5.Dangari, 6. Bhoyar, Pawar , 7.Kapewar , Munnar Kapewar, Munnar Kapu, Telanga, Telangi, Pentarreddy, Bukekari इत्यादी जातींचा समावेश केंद्र शासनाच्या OBC च्या यादीमध्ये करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ ला केलेले आहे. परंतु त्यावर अपेक्षित कार्यवाही होऊन केंद्र शासनाकडून राष्ट्रपतींच्या मंजुरीस पाठवून राजपत्र प्रसिध्द करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.परिणामी केंद्र शासनाच्या कोणत्याही नोकरीसाठी अथवा योजनांच्या लाभासाठी ‘केंद्र शासनाच्या यादीत’ इतर मागास वर्गात समावेश नसल्यामुळे हा समाज वंचित आहे.

विकासाच्या दृष्टीने, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, रेल्वे भरती, कर्मचारी निवड समितीच्या पदभरतीतल्या वयातील सवलतीविषयी, संधीमधील शिथीलतेसाठी व केंद्र शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळण्यासाठी वरील नमूद जाती-जमातींचा केंद्र शासनाच्या ‘इतर मागास वर्ग’ या प्रवर्गात समाविष्ट झाल्याबाबत राजपत्रात लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी दक्षिण गडचिरोली मुन्नुर कापेवार –बेलदार समाजाचे मार्गदर्शक रविंद्र भंडारवार यांनी भारताचे राष्ट्रपती,पंतप्रधान यांना निवेदन पाठवून केली आहे.