भगवंतराव महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा

511

एटापल्ली – आज दिनांक १५/०८/२०२५ रोजी भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आला. स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य मा. दत्तात्रेय सावकार राजकोंडावार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संदिप मैंद यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. संभाजी हिचामी,माजी पं स. सभापती श्री. जनार्दन नल्लावार, नगरसेवक श्री. राहुल कुळमेथे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. पोर्णिमा श्रीरामवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन बुटे, प्राचार्य श्री. डी. व्ही. पोटदुखे तसेच भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय व भगवंतराव माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळेचे प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी भगवंतराव माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा एटापल्ली येथील विद्यार्थ्यांकडून विविध कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांकडून व्यसनमुक्ती ची शपथ घेण्यात आली.
आजची तरुण पिढी विशेषतः ग्रामीण भागातील शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहे,ते व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. आजच्या तरुण हा व्यसनमुक्त राहावा याची जाणीव जागृती व्हावी या दृष्टिकोनातून पोलीस विभाग एटापल्ली यांच्या तर्फे व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. एटापल्ली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. नागरगोजे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व दारु, तंबाखू व खर्रा या व्यसनांपासून मुक्त राहण्याचे आवाहन केले. तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. मंडल यांनी व्यसनांपासून होणाऱ्या रोगांची तसेच शरीरावर होणाऱ्या परिणामांची माहिती दिली. यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्री. साखरे साहेब यांनी विद्यार्थ्यांकडून व्यसनमुक्ती ची शपथ घेतली