गडचिरोलीच्या शासकीय गोदामात गोदाम व्यवस्थापकाचा तांदूळ स्वीकृत करण्यास नकार
देसाईगंज-
गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज येथील आकाश अग्रवाल गोडाऊन मधुन स्वीकृत करण्यात आलेला मानवी खाण्यास अयोग्य तांदूळ गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल तीन शासकीय गोडाऊन मध्ये स्वीकृत न करता परत करण्यात आल्याची घटना ताजी असतांनाच गडचिरोलीच्या शासकीय गोदामातही देसाईगंज येथील आकाश अग्रवाल गोडाऊन मधुन विशाल राईसमिलचा निकृष्ठ तांदूळ आढळून आला आहे.यामुळे एकुणच आकाश अग्रवाल गोडाऊन मधुन मानवी खाण्यास अयोग्य तांदळाचा वारंवार पुरवठा केल्या जात असल्याचे गडचिरोली येथील गोदाम व्यवस्थापकाने आढळून आलेला तांदुळ स्वीकृत करण्यास नकार दिल्याने आकाश अग्रवाल गोडाऊन मध्ये निकृष्ठ तांदूळ स्वीकृत करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या गुणनियंत्रण अधिकारी व त्याचेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले निरिक्षण अधिकारी हे दोषी असल्याने त्यांना तात्काळ निलंबित करून निकृष्ठ तांदळाचा पुरवठा करणाऱ्या मिलरवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली असल्याने संबंधित विभागात एकच खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनुसार देसाईगंज येथील आकाश अग्रवाल गोडाऊन मधुन विशाल राईसमिलचे संचालक पुरुषोत्तम डेंगानी यांचा मानवी खाण्यास अयोग्य सिएमआर तांदुळ येथील गुणनियंत्रण अधिकारी व निरिक्षण अधिकारी यांनी संगनमताने कोणतीही गुणवत्ता तपासणी न करता गडचिरोली येथील शासकीय गोदामात दि.३१ जुलै २०२५ रोजी सार्वजनिक वितरणाकरीता गडचिरोली येथील अनुराग ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या एमएच-34 एम- 6133 या क्रमांकाच्या वाहनाने तब्बल 450 कट्टे सिएमआर तांदुळ आकाश अग्रवाल गोडाऊन देसाईगंज(वडसा) येथुन गडचिरोली येथील शासकीय गोदामात पाठवला होता.सदर तांदुळ विशाल राईसमिल कुरुडचे संचालक पुरुषोत्तम डेंगानी यांच्या मिलमध्ये भरडाई करून आकाश अग्रवाल गोडाऊन देसाईगंज येथे गुणवत्ता तपासणी करीता पाठविण्यात आल्याचे भासविण्यात आले.वास्तवात सदर तांदळाची कोणतीच गुणवत्ता तपासणी न करता मानवी खाण्यास अयोग्य तांदुळ पाठविण्यात आल्याचे गडचिरोलीच्या शासकीय गोदामातील गोदाम व्यवस्थापक नरेन्द्र खोब्रागडे याने सदर तांदुळ मानवी खाण्यास अयोग्य असल्याचे सबब पुढे करून सदर तांदूळच गोदामात उतरवून स्वीकृत करण्यास नकार देत आकाश अग्रवाल गोडाऊन व विशाल राईसमिल यांना तब्बल 450 कट्टे तांदुळ बदलून देण्यासंदर्भात पत्र दिले.
वास्तवात देसाईगंज येथील आकाश अग्रवाल गोडाऊन मधुन विशाल राईसमिल कुरुडचा तांदुळ येथील गुणनियंत्रण अधिकारी व निरिक्षण अधिकारी यांनी सदर तांदळाची गुणवत्ता तपासणी करूनच गडचिरोली येथील शासकीय गोदामात सार्वजनिक वितरणाकरीता पाठवणे आवश्यक होते.मात्र येथील जबाबदार अधिकाऱ्यांनी सदर तांदळाची कोणतीच गुणवत्ता तपासणी न करता गडचिरोली येथील शासकीय गोदामात पाठवल्याचे यामुळे स्पष्ट होते.असे असल्याने गडचिरोली येथील शासकीय गोदाम व्यवस्थापक नरेंद्र खोब्रागडे याने सदर तांदुळ जप्त करून व तसा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर करून सदर तांदळाचा पंचनामा करणे अपेक्षित होते.तसेच मानवी खाण्यास अयोग्य तांदळाचा पुरवठा करणाऱ्या विशाल राईसमिलचे संचालक पुरुषोत्तम डेंगानी यांचेवर जीवनावश्यक वस्तु अधिनियमांतर्गत व पुरवठा करण्यात आलेल्या तांदळाची कोणतीही गुणवत्ता तपासणी न करता तांदुळ स्वीकृत करणाऱ्या आकाश अग्रवाल गोडाऊन देसाईगंज येथील गुणनियंत्रण अधिकारी व निरिक्षण अधिकारी यांचेवर कायदेशीर कारवाई होणेस्तव आवश्यक कारवाई करणे अपेक्षित होते.
दरम्यान गडचिरोली येथील शासकीय गोदामात कर्तव्यावर असलेल्या गोदाम व्यवस्थापक नरेंद्र खोब्रागडे यांनीही असे न करता पाठवलेल्या तांदळाचे वाहान खाली करून नियमानुसार स्वीकृत केलेला तांदूळ बदलून न मागता कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असतांना कर्तव्यात कसूर करून संबंधितांना लाभ पोहचवण्याचा प्रयत्न केला असल्याचे यावरून दिसून येते.एकुणच घडामोडींवरून संगनमताने मानवी खाण्यास अयोग्य तांदळाचा पुरवठा करून आर्थिक लाभ पोहचवणे हा उद्देश असल्याचे स्पष्ट होत असल्याने या गंभीर तेवढ्याच धक्कादायक प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणात दोषी असलेल्या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.याबाबत संबंधित विभागाचे अधिकारी काय कारवाई करतात याकडे येथील नागरीकांचे लक्ष लागून आहे.विशेष म्हणजे मानवी खाण्यास अयोग्य तांदळाचा पुरवठा करून सार्वजनिक वितरण प्रणालिच्या माध्यमातून भाग पाडणारांवर सक्त कारवाई करण्याची वारंवार मागणी करण्यात आल्यानंतरही गडचिरोली येथील शासकीय गोदामात परत तिसऱ्यांदा आकाश अग्रवाल गोडाऊन देसाईगंज येथे निकृष्ठ तांदुळ स्वीकृत करून पाठविण्यात आला असल्याने या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून असुन कारवाई करण्यात न आल्यास येथील सामाजिक कार्यकर्ते आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याने करण्यात येत असलेल्या कारवाईकडे येथील नागरीकांचे लक्ष लागून आहे.