एटापल्ली ते वांगेतूरी बस फेरी मेढरी पर्यंत वाढविण्यात यावे- भारतीय कम्युनिष्ट पक्ष (CPI)

147

प्रतिनिधी//

एटापल्ली (२ ऑगस्ट) :
एटापल्ली ते वांगेतुरी या मार्गावर सध्या राज्य परिवहन महामंडळाची बसफेरी सुरू आहे. या फेरीमुळे ग्रामस्थांना काही प्रमाणात दिलासा मिळतो. मात्र वांगेतुरीनंतरच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अजूनही बससुविधेअभावी त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे मेढरी हे छत्तीसगड सीमेवरील शेवटचे गाव असून, बसफेरी तिथपर्यंत वाढल्यास आदिवासी भावांना मोठा दिलासा मिळेल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज अहेरी आगारप्रमुखांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात एटापल्ली–वांगेतुरी बसफेरी दररोज किमान एक वेळेस मेढरीपर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन देताना भाकपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य कॉ. सुरज जक्कुलवार यांच्यासोबत भाकपा तालुका सहसचिव कॉ. विशाल पूज्जलवार आणि किसान सभा तालुका उपाध्यक्ष सत्तू हेडो उपस्थित होते..
कॉ. सुरज जक्कुलवार यांनी सांगितले की,
मेढरीसह परिसरातील गावांमध्ये राहणारे नागरिक, विद्यार्थी, रुग्ण आणि स्थानिक जनता बँक व इतर शासकीय कामाकरिता एटापल्ली ये जा करावा लागते यांना बससुविधेअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. बसफेरी मेढरीपर्यंत वाढल्यास या भागातील जनतेला मोठा दिलासा मिळेल

भाकपाने इशारा दिला आहे की,
जर ही मागणी तातडीने पूर्ण केली नाही, तर स्थानिक जनतेच्या सहकार्याने आंदोलन छेडण्यात येईल…