आदिवासी समाजातील पीएचडी पदवी प्राप्त अनुप कोडाप यांचा परिषदेतर्फे सत्कार
गडचिरोली – अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नई दिल्ली जिल्हा गडचिरोली ची विशेष बैठक विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉक्टर देवराव होळी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्राम भवन (कॉम्प्लेक्स) गडचिरोली येथे 18/07/2025 ला संपन्न झाली. या बैठकी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात दरम्यान जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन संबंधित मंत्री व त्यांच्या अपर सचिवांना पत्र व्यवहार करून समस्या सोडवण्यासाठी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या मार्गदर्शनात उमेश उईके व सुरज मडावी यांनी पत्रव्यवहार केला यामध्ये १) कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुक्यात पोखरा योजना कार्यान्वित नाही त्या तालुक्यात पोखरा योजना लागू करण्यात यावी. २) आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांच्याकडे निवेदनाद्वारे राज्यातील आश्रम शाळा सुरू झाल्या असून अजून पर्यंत आदिवासी वस्तीगृह सुरू झाले नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे वस्तीगृह तात्काळ सुरू करण्यात यावे. ३) राज्यातील आश्रम शाळांमध्ये नर्स पदभरती संदर्भात स्थानिक पदभरती संदर्भात स्थानिक पात्रताधारक तथा आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्या नियमावली नुसार नियुक्ती करण्यात यावी. व अन्य समस्यांचे निवेदन देण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. सोबतच जिल्ह्यात विकास परिषदेच्या वाढी संदर्भात चर्चा करण्यात येऊन आगामी काळात प्रत्येक तालुक्यात बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.
याप्रसंगी गडचिरोली या दुर्गम जिल्ह्यातील पोटेगाव येथिल रहिवासी असलेले अनुप रामदास कोडाप यांनी हलाखीच्या परिस्थितीतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर केंद्रीय खाद्य प्रौद्योगिक अनुसंधान म्हैसूर कर्नाटक येथून वनस्पतीशास्त्र ( जीवशास्त्र/खाद्यशास्त्र) या विषयात सन 2025 मध्ये पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या बैठकीच्या वेळेस उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना माजी आमदार व परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. देवराव होळी साहेब यांनी सांगितले की समाजातील कार्यकर्त्यांनी समाजकारण करताना खचून न जाता जिद्द व चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील अनुप कोडाप हे साधारण परिवारातून येऊन सर्वात कठीण असलेल्या विषयात पीएचडी प्राप्त केले. तसेच त्यांनी पाच वर्षाचा अभ्यासक्रम चार वर्षात पूर्ण केला व आपले ध्येय साधले. त्याचप्रमाणे समाजकारण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा जिद्द व चिकाटीने समाजकार्य करावे. यासाठी विकास परिषदेत येऊन संघटना बळकट करावी व समाजाला एकत्रित करण्याचे कार्य करावे.
या बैठकीचे सुत्रसंचालन विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष वामन जुनघरे यांनी केले. बैठकीत विद्या दुगा, मालता पुडो, आरती कोल्हे, शारदा मडावी, शालिनी पेंदाम, रोहिणी मसराम, माधुरी पडोटी, निलीमा कोवे, लिना कोकोडे, रवीना उसेंडी, रेखा तोडासे, मंजु आत्राम, सुनिता कोडापे, अर्चना टेकाम, तनुजा कुमरे, मारोतराव ईचोडकर, प्रियदर्शन मडावी, मुकुंदा मेश्राम, हरिचंद्र कन्नाके, अनुप कोडाप, यशवंत नैताम, राजीवशहा मसराम, जीवन मडावी, जीवन मेश्राम, श्याम सलामे, आदि पदाधिकारी उपस्थित होते.