नेहमी सर्वांच्या हाकेला धावून जाणारे व्यक्तिमत्व.कधीही कुठलीही परिस्थिती असो सर्वांच्याच मदतीला हाकेला धावून जाणारे व मदत करणारे राजे साहेब.काल तेलंगणा येथे लग्न समारंभ आटोपून मूळगावी छल्लेवाडा परत येताना वांगेपल्ली वळणावर चालकाचा नियंत्रण सुटल्याने वाहनाचा अपघात झाला होता. त्यात काही प्रवासी गंभीर जखमीं झाले.ते अहेरी
ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते.ही माहिती मिळताच क्षणांचा विलंब न करता राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी तात्काळ रुग्णालयात पोहोचले व त्यांची विचारपूस करून त्यांना आर्थिक मदत केले.पुढेही काही मदत लागली तर मला निःसंकोचपणे सांगा मी मदत करेन असे त्यांनी यावेळी म्हटले.
यावेळी उपस्थित कुमार अवधेशराव बाबा आत्राम,विकास उइके नगरसेवक न.पं अहेरी,विनोद जिल्लेवार सोशल मीडिया संयोजक अहेरी विधानसभा, विकास तोडसाम,रविभाऊ जोरीगलवार होते.