झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोलीच्या वतीने ऑनलाईन काव्यसंमेलन संपन्न

96

झाडीबोली साहित्य मंडळ, गडचिरोली यांच्या वतीने दिनांक १० जुलै २०२५ रोजी एक भव्य ऑनलाईन काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लक्ष्मण रत्नम (तालुका अध्यक्ष, झाडीबोली साहित्य मंडळ, अहेरी शाखा) यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विनायक धानोरकर (जिल्हाध्यक्ष, झाडीबोली साहित्य मंडळ, गडचिरोली) यांची विशेष उपस्थिती लाभली, तर डॉ. प्रवीण कीलनाके (उपाध्यक्ष, झाडीबोली साहित्य मंडळ, गडचिरोली) यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपेंद्र रोहनकर आणि संजीव बोरकर यांनी अत्यंत सुरेख पद्धतीने केले. कार्यक्रमात चौदा कवी व कवयित्रींनी विविध भावभावनांनी ओथंबलेल्या कविता सादर करून श्रोत्यांचे मन जिंकले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रेमीला अलोने यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
झाडीबोली भाषेच्या संवर्धनासाठी आणि ग्रामीण भागातील कवी-कवयित्रींना अभिव्यक्तीसाठी एक सशक्त मंच उपलब्ध करून देणारे असे कार्यक्रम नक्कीच प्रेरणादायक ठरत आहेत, असे मत उपस्थित साहित्यप्रेमींनी व्यक्त केले.