राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे युवा नेते ऋतुराज हलगेकर यांचा वाढदिवस रुग्णांना फळवाटप करून साजरा – सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम

237

प्रतिनिधी//
अहेरी:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे युवा व सक्रिय नेते मा. ऋतुराज हलगेकर यांचा वाढदिवस आज अत्यंत सामाजिक जाणीवेने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय, अहेरी येथे रुग्णांना फळांचे वाटप करून या दिवशी सेवा आणि मदतीचा संदेश देण्यात आला.

**या कार्यक्रमाला पक्षाच्या विभागीय अध्यक्षा मा. शाहीनताई हकीम यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती दर्शविली**त्यांनी ऋतुराज हलगेकर यांचे कौतुक करताना सांगितले की, “आजच्या पिढीतील तरुणांनी ऋतुराजसारखे समाजकार्याच्या माध्यमातून जनतेच्या सेवेत उतरले पाहिजे. वाढदिवस साजरा करताना आनंदाबरोबर समाजासाठी काहीतरी सकारात्मक देण्याची ही भावना स्तुत्य आहे.”

कार्यक्रमाचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध रीतीने करण्यात आले होते. रुग्णालयातील सर्वच रुग्णांना फळवाटप करून त्यांच्या आरोग्याबद्दल विचारपूस करण्यात आली. उपस्थित रुग्णांनी व त्यांच्या नातेवाइकांनीही हा उपक्रम अत्यंत सकारात्मक आणि दिलासादायक असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात माजी तालुकाध्यक्ष श्रीनिवास वीरगुनवार ज्येष्ठ नेतेश्रीनिवास चटारे सालय्या कबलवार स्वप्निल श्रीरामवार सुमित मोतकुरवार अब्दुल रहेमान अब्दुल बाबू लायक शेख संतोष येमुलवार शाहरुख शेख आदिल शेख मूगमोडे ताई गोबाडे ताई यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते