ताडाम सर यांच्या नेतृत्वामुळे अधीक्षक/अधिक्षिका यांना फुटले नवे अंकुर

245

आज दिनांक १८/६/२६ रोजी महाराष्ट्र राज्य अनुदानित अधीक्षक/अधीक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना नागपूर विभागिय सहविचार सभा विश्वकर्मा सभागृह चंद्रपूर येथे पार पडली. सदर सभेला नागपूर विभागातील वर्धा, भंडारा, गोंदिया, (देवरी )चिमुर, नागपूर, चंद्रपूर गडचिरोली ,अहेरी व भामरागड येथील अधीक्षक/ अधीक्षिका उपस्थित होते.
सभेचे प्रामुख्याने सभासद फी जमा करणे, तसेच 10/20/30आस्वाशित प्रगती योजना लागू करण्यात यावी. आणि कामाचे तास निश्चित करण्याबाबत चर्चा किंवा सहाय्यक अधिक्षक/ अधिक्षिका ची मागणी लावुन धरणे या बाबत श्री ताडाम सर यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.
सभेचे प्रास्ताविक काळे सर यांनी केले. सभेचे प्रमुख मार्गदर्शन श्री बरडे सर श्री चाफले सर श्री सरादे सर श्री गंधारे सर श्री मुरकुटे सर श्री मारकवार सर सौ धार्मिक मँडम सौ ईंगोले मँडम सौ गावंडे मँडम सौ पल्लवी मांडवकर मँडम सौ उंदीरवाडे मँडम इ.मान्यवरानी अधिक्षक अधिक्षिका व आश्रम शाळेतील ज्वलंत समस्या वर विस्तृत अस मार्गदर्शन केले.तसेच उपस्थित सदस्यांपैकी बर्याच सदस्यांनी आपआपले अनुभव व समस्या व्यक्त केल्या. शेवटी मा सभेचे अध्यक्ष श्री ताडाम सर यांनी सर्व सदस्यांच्या अडचणी संघटनेच्या माध्यमातून कशा पद्धतीने सुटतील या बाबत आपल्या अध्यक्षिय भाषणातून समाधानकारक पणे समजावून सांगितले.
आभार प्रदर्शन श्री मारकवार सर यांनी केल्यानंतर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला, व सभेची सांगता झाली.