:- नाशिक येथे महानिर्मिती, महापारेषण, महावितरणचे एक दिवसीय अधिवेशन दिनांक १४.६.२०२५ रोजी संपन्न झाले. त्या अधिवेशनात महानिर्मिती, महापारेषण, महावितरण तिनही कंपनीतील सुरक्षा व दक्षता विभागातील अधिकारी संघटना नव्याने गठीत करण्यात आली. महाराष्ट्र अध्यक्ष पदावर श्री.ड्रेफुल आत्रामजी (माजी सैनिक) यांची निवड झाली तर सरचिटणीस श्री.उदयमित्र समाधान इंगळे महानिर्मिती, उपाध्यक्ष पदासाठी श्री. सतीश राजपूत, महावितरण, श्री विकास अरिंगळे महानिर्मिती, सहसचिव पदासाठी श्री. प्रवीण रामटेके, महनिर्मिती, सल्लागार पदी श्री. संदीप साळुंखे ,महानिर्मिती विधी सल्लागार श्री. धवल लोखंडे , सह सचिव पदासाठी ,श्री. कैलास राठोळ, सल्लागार , म्हणून श्री. यशवंत गोडघाटे , रिजन प्रतिनिधी या पदासाठी श्री. विस्वनाथ बिसने श्री.नागनाथ कोरे,. श्री. योगेश बोरसे श्री. किरण वणवे , खजीनदार या पदासाठी श्री. संदीप लाहंगे महिला प्रतिनिधि म्हणून सौ. नेहा मिश्रा, सौ. रुपाली बोबळे, सौ. किरण भुईगड यांची निवड करीत ही नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली.
या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. व सर्व स्तरावरून शुभेच्यांचा वर्षाव व सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.