गडचिरोली:- जिल्हा हिवताप अधिकारी अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील आरोग्य सेवक कर्मचार्यांचे थकीत मानधन त्वरित द्या या मागणीचे मा.खासदार किरसान साहेब यांना सर्व पेसा आरोग्य कर्मचारी जिल्हा गडचिरोली यांचे निवेदन.
सविस्तर असे की, राज्यातील हिवताप विभागातील कार्यरत अनुसूचित (पेसा) क्षेत्रातील रिक्त जागांवर आरोग्य कर्मचारी (पुरुष) या पदावर शासनाने नऊ महिन्यांपूर्वी एकत्रित मानधन तत्वावर हिवताप विभाग(राज्यक्षेत्र) व जिल्हा परिषद स्थानिक विभागात आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे, परंतु या नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांचे सुरवातीपासूनच म्हणजे नऊ महिन्याचे मानधन अदा झाले नाही. यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जिल्हा परिषद स्थानिक विभागात संबंधित कर्मचाऱ्यांचे शासनाकडून नुकतेच अनुदान प्राप्त झाले परंतु राज्यातील हिवताप विभागातील (राज्य क्षेत्र) आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानधनासाठी अनुदान प्राप्त झालेले नाही.
राज्यातील हिवताप विभाग अनुसूचित क्षेत्रात (पेसा) कार्यरत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी(पुरुष) या पदावर कार्यरत असलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे थकीत नऊ महिन्याचे मानधन त्वरित व एकरकमी देण्यात यावे या मागणीचे निवेदन सर्व पेसा आरोग्य कर्मचारी( हिवताप विभाग) यांनी खासदार किरसान साहेब यांना दिले आहे.
यावेळी आरोग्य कर्मचारी लोकेश मडावी, मयूर कोडापे, लंकेश तुलावी, निखिल उसेंडी, सुजितकुमार आतला यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
Home गडचिरोल्ली जिल्हा हिवताप अधिकारी गड़चिरोली अंतर्गत (अनुसूचित क्षेत्र) आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन...