दिनांक 06/06/2025 रोजी पोलिस स्टेशन एटापल्ली हद्दीतील एटापल्ली येथे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून उप विभागीय पोलिस अधिकारी एटापल्ली चैतन्य कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निळकंठ कुकडे साहेब पोलिस उप निरीक्षक शुभम मैत्रें महिला पोलीस उप निरीक्षक रोहिणी गिरवलकर मॅडम पोलिस शिपाई मोहन शिंदे,महिला पोलिस शिपाई प्रियंका तुलावी व चालक पोलिस हवालदार गावडे यांच्या टीम ने एटापल्ली येथे इसम अर्शद शरीफ शेख वय 22 वर्ष यांच्या घरी दोन पंचां समक्ष घरझडती घेतली असता आरोपी याने त्याचे राहते घरी 7 खरड्यचे बॉक्स मध्ये रॉकेट देशी संत्रा दारूच्या 90 मिली मापाचा एकूण 700 निपा प्रत्येक निप विक्री किंमत 100 असा एकूण 70000 रुपयाचा मुद्देमाल एटापल्ली पोलिसांना जप्त केला आहे सदरचा माल हा गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी असल्याचे माहीत असून देखील आरोपीने बेकायदेशीर पने विक्रीकरिता बाळगून ठेवल्याने आरोपी विरुद्ध एटापल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीकडे अधिक विचार पूस केली असता हा माल त्याने साहिल मुखत्यार शेख यांचे कडून आणला असल्याची माहिती पोलिसांना दिली आरोपी साहिल शेख यांचा शोध सुरू असून पुढील तपास. पोलिस निरीक्षक निळकंठ कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक गजानन साखरे हे करीत आहेत…