*एटापल्ली:-* दिनांक ०५/०६/२०२५ रोजी गुरुवारी सकाळी ११:३० वाजता सांस्कृतिक भवन गोटूल येथे एक महत्त्वपूर्ण लोकार्पण सोहळा पार पडला.
पुणे येथील आरोग्य विभागाकडून नगर पंचायत एटापल्लीला प्राप्त झालेल्या नवीन शववाहिकेचे लोकार्पण दीपयंती निजान पेंदाम नगराध्यक्षा,नगर पंचायत एटापल्ली यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या नवीन सुविधेमुळे एटापल्लीतील नागरिकांना मोठी मदत मिळणार आहे.
या प्रसंगी प्रणय तांबे, मुख्याधिकारी,नगर पंचायत एटापल्ली,निजान पेंदाम (नगरसेवक),राघवेंद्र सुल्वावर (नगरसेवक) यांच्यासह नगर पंचायतीचे इतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही शववाहिका एटापल्लीकरांसाठी अंत्यसंस्काराच्या वेळी वाहतुकीची मोठी समस्या सोडवण्यास मदत करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या या योगदानामुळे स्थानिक प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.