गडचिरोली ता. चामोर्शी:: जागतिक पर्यावरण दिन (५ जून) चे औचित्य साधून,चामोर्शी तालुक्यातील मारोडा येथे शिवकल्याण युथ मल्टीपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन, गडचिरोली या सामाजिक संस्थेच्या वतीने, “एक वृक्ष – अनेक जीवन” या संदेशाने प्रेरित होऊन वृक्षारोपण करण्यात आले.
या उपक्रमात विविध प्रकारची फळझाडे, सावलीची झाडे व औषधी वनस्पतींचे रोपण करण्यात आले.
कार्यक्रमावेळी संस्था अध्यक्ष अनुप कोहळे यांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा आणि दरवर्षी झाडे लावून त्यांचे पालनपोषण करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. “फक्त झाडे लावणे नव्हे तर त्याचे संगोपन करणे हेच खरी जबाबदारी आहे” असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य रोशन कोहळे, ग्रामसेवक कल्पेश हरडे, बाबुराव वासेकर, खुशाल लोळे , ओमदेव कीनेकार , शत्रुघन कोहळे, प्रणिता लोळे , वेणूबाई कोहळे, लेखाजी नैताम , रजनीकांत सातपुते, विश्वनाथ लोळे, तक्ष वाडके, रवींद्र कुणघाडकर , स्नेहल गायकवाड, आदर्श चौधरी, कृष्णा मोहुर्ले, वेदांत मोहुर्ले सह संस्थेचे सदस्य, स्वयंसेवक, आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
वृक्षारोपणा करिता वृक्ष उपलब्ध करून दिल्याबद्दल तालुका कृषी अधिकारी अमित तुमडाम सर यांचे विशेष आभार संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे पर्यावरणाबाबत समाजात जागरूकता निर्माण व्हावी व भावी पिढ्यांसाठी हिरवे गडचिरोली साकारावे, हा उद्देश संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला. उपस्थितांनी पर्यावरण रक्षणासाठी अशाच उपक्रमात सातत्य ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.