गट्टा येथे ‘किसान जनसंसद’ संपन्न – शेकडो गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, लोकशाही संवादाची नवी दिशा-ऑल इंडिया किसान सभा

116

प्रतिनिधी//

गट्टा (ता. एटापल्ली) | २२ मे २०२५

गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेच्या विविध समस्या थेट लोकप्रतिनिधींना मांडण्यासाठी आणि प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात एक सशक्त आवाज निर्माण करण्यासाठी ‘ऑल इंडिया किसान सभा’ व सुरजागड इलाका ग्रामसभाच्या वतीने गट्टा येथे ‘किसान जनसंसद (जनता दरबार)’ चे आयोजन करण्यात आले. पारंपरिक गोटूल येथे पार पडलेल्या या भव्य कार्यक्रमाला परिसरातील सुमारे ७० गावांतील ग्रामस्थ, युवक, महिला, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली समस्यांची मांडणी केली.

गट्टा क्षेत्रातील महत्त्वाचे मुद्दे पुढे आले

या दरबारात अनेक ज्वलंत समस्या समोर आल्या. काही प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे होत्या:
स्थानिक जल जंगल जमीनचा प्रश्न उपस्थित करण्यात आला तसेच
अनेक गावांमध्ये अजूनही वीज उपलब्ध नाही; जिथे आहे तिथे वारंवार खंडित होते.
अनेक भागात ये जा करण्यासाठी पुरेसे रस्त्याची सोय नाही,
शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, अपुरी शैक्षणिक साधने आणि विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या अडचणी.
ग्रामवाचनालय सुरू करण्याची नागरिकांची मागणी.
पाण्याबाबतीत सुद्धा हातपंप आणि बोअरवेल्स, ड्युअल पंप बंद पडले असून पिण्याच्या पाण्याचा तीव्र अभाव.
स्थानिक युवकांसाठी प्रशिक्षण केंद्रे व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची गरज.
वनहक्क व जमिनीच्या पट्ट्यांबाबत प्रश्न, तसेच शासकीय योजनांमधील भ्रष्टाचारविरोधात कारवाईची मागणी.

खासदारांनी घेतली समस्या ऐकून घेतलं भविष्यात या सर्व समस्या मार्गी लावतील अशी घोषणा त्यांनी केली व दरवर्षी गट्टा गावाला भेट देईल असे पण बोलले,

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे लोकांनी पहिल्यांदाच आपले प्रश्न थेट गडचिरोली चिमूर लोकसभेचे खासदार मा. डॉ. नामदेव किरसान (INDIA आघाडी) यांच्यासमोर मांडले. त्यांनी नागरिकांचे म्हणणे अत्यंत गंभीरतेने ऐकून घेतले आणि काही बाबींसाठी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. तसेच जल,जंगल जमीन दमकोदावाही पहाडी वाचण्यासंदर्भात संदर्भात सुद्धा मा सैनुजी गोटा व इतर कार्यकर्ते मागण्यांसाठी संसदेत आवाज उठवण्याचे आश्वासन खासदार साहेब यांनी दिलेत.

उपस्थित मान्यवरांची उपस्थितीने कार्यक्रमास अधिक बळ

कार्यक्रमात विविध पक्षांचे व ग्रामसभेचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये सैनुजी गोटा (सुरजागड इलाका प्रमुख),
कॉ. सचिन मोतकुरवार किसान नेते (विधानसभा प्रमुख, भाकपा व राज्य उपाध्यक्ष, AIYF), कॉ. जगदीश मेश्राम किसान नेते (जिल्हा सहसचिव, भाकपा), मा अजयभाऊ कंकडालवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, प्रज्वलभाऊ नागूलवार काँग्रेस नेते, कॉ. रमेश कवडो (तालुका अध्यक्ष, किसान सभा), महेंद्र ब्राम्हणवाडे (जिल्हा अध्यक्ष, काँग्रेस), कन्ना गोटा पाटील (गट्टा),सतीश मुप्पलवार शहर अध्यक्ष, प्रदीप हेडो पाटील (मोहंदी), महादू कवडो पाटील (रेकलमेट्टा), विष्णू हिचामी अडेंगे, रितेश जोई, रामदास उसेंडी, विनोद होळी, विलास नरोटी सचिव अविका गर्देवाडा, धर्मा तिम्मा पाटील मेड्री, सत्तू हेडो पाटील कोईनवर्षी, बंडू नरोटी पाटील वाटेली,दलसू पुंगाटी पाटील गुडुंजूर, मनोहर लेकामी गिलनगुडा, गोविंद शहा, मिथुन मल्लिक, परेश बिस्वास, कमला येमुलवार, तोरे ताई, तोडगट्टा पाटील कोवासी, व इतर अनेक ग्रामसभा व किसान सभेचे कार्यरते उपस्थित राहून अनेक प्रश्न उपस्थित केलेत.

लोकशाही संवादाची प्रेरणादायी सुरुवात

गावकऱ्यांनी अशा प्रकारे मोकळेपणाने थेट प्रतिनिधींशी संवाद साधण्याची ही कदाचित पहिलीच संधी होती. त्यामुळे कार्यक्रमाच्या शेवटी नागरिकांत एक विश्वास निर्माण झाला की, लोकशाही ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित न राहता, ती सततच्या संवादातून अधिक बळकट होऊ शकते.

‘किसान जनसंसद किंवा जनता दरबार ही उपेक्षितांचा आवाज बनून पुढे येत असून, अशा उपक्रमांची आवश्यकता भविष्यात आणखी वाढेल, असा सूर अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला आणि येणाऱ्या काळात जल जंगल जमीन वाचण्यासाठी सुद्धा खासदार प्रश्न उपस्थित करतील अशी ग्वाही सुद्धा त्यांनी तिथे दिली….