अहेरी राजनगरीतील मूख्य रस्ता चमकणार की काय

308

प्रतिनिधी//

अहेरी दोन वर्षापासून बहुचर्चित- प्रदिर्घ काळा पासून अहेरीचे रस्ते वादाच्या भोव-यात अडकलेले आहे कित्येक आंदोलन झाले विरोधी पक्ष यांच्या मार्फत रस्ता रोको जेल भरो आमरण उपोषण झाले. शासकीय यंत्रणा कसेबसे तात्पुरत्या स्वरूपात समस्या सोडविण्याचे काम करत होते. परंतु काम अजूनही थंड व्यवस्थेत आहे. रस्त्यावरून महिलांना गाडी चालवणे अवघड झाले मणक्याचे आजार वाढले पाठदुखीचा त्रास वाढला ठेकेदाराने फक्त तारीख पे तारीख देऊन आम जनतेची दिशाभूल केली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी रस्त्यावर येऊन मोजमाप करताना तात्पुरता आनंद अहेरी वासियांना झालेलाच आहे आता बघायचंय फक्त रस्त्याचे काम किती दिवसात होते वाहन गाड्याचे तिन तेरा वाजलेले आहे तरी कोण समस्या सोडवेल अशी आम जनता देवा कडे जावून साकड घालणे उरले होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग अल्लापल्ली चे अधिनस्त असलेले रस्त्याचे अधिकारी आज मोजमाप करताना दिसले. लवकरच अहेरी राजनगरीचे रस्ते चमकेल काय या कडे आम जनतेचे लक्ष्य लागले आहे.