भारत माता की जय’ च्या घोषनांनी अहेरी दुमदुमली. अहेरीत निघाली सर्वपक्षीय भव्य तिरंगा रॅली.

139

प्रतिनिधी//

*अहेरी:-* आतंकवाद्यांद्वारे पहलगाम येथे घडलेल्या भ्याड हल्यात २६ भारतीय पर्यटकांना प्राण गमवावे लागले. भारताच्या तिनही सेना दलानी प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदुर’ यशस्वीरित्या राबविले. अल्पावधीतच तिनही दलाच्या सैन्याने पाकीस्तान मधील दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबुत केले आणि त्यांना प्रोत्साहन देणार्‍या पाकिस्तानचे सुध्दा कंबरडे मोडले. ऑपरेशन दरम्यान पाच भारतीय जवान शहीद झाले.भारतीय सेनेच्या सन्मानार्थ व शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी अहेरी शहरात सर्वपक्षीय भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. अहेरी शहरातील रस्ते भारत माता की जय इत्यादी घोषणांनी दणाणुन गेले.या ऐतिहासिक यशाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सेनेच्या शौर्य,त्याग आणि समर्पणाच्या गौरवार्थ आयोजित भव्य तिरंगा यात्रेत प्रचंड संख्येने अहेरीकर उपस्थित होते.प्रत्येक पावलागणिक वीर जवानांप्रतिची कृतज्ञता,सन्मानाची भावना आणि देशसेवेची प्रेरणा स्पष्ट जाणवत होती.

राजे विश्वेश्वरराव महाराज चौकातील शहीद स्तंभाला पुष्पमाला अर्पण करुन शहीदांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर रॅलीला सुरुवात झाली.

भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (शिंदे गट) व हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आवर्जुन सहभागी झाले.