महाराष्ट्र दिनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडबामणी येथे चावडी वाचनाचा प्रेरणादायी उपक्रम

155

प्रतिनिधी//

गडबामणी (अहेरी) : १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडबामणी येथे ध्वजारोहणानंतर चावडी वाचनाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर कुसराम होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक उल्लीवार सर उपस्थित होते. सहाय्यक शिक्षक सचिन येरोजवार, अंगणवाडी सेविका रामटेके ताई, तसेच अनिल नैताम व अरुण येदुल यांची विशेष उपस्थिती लाभली.

ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून चावडी वाचनाची सुरुवात करण्यात आली. चावडी वाचनाची जबाबदारी दीक्षा कुसराम, आरुषी रामटेके, अपर्णा येदुल, आणि आराध्या सुनतकर या विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या पार पाडली.

कार्यक्रमात मुख्याध्यापक उल्लीवार सर यांनी विद्यार्थ्यांसोबत गावातील नागरिकांनाही मार्गदर्शन केले. चावडी वाचनानंतर शाळेचा निकाल जाहीर करून गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे संचलन कु. गंगु सिडाम मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक श्री. सचिन येरोजवार यांनी केले.

या कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे उत्साहवर्धन केले. एकात्मतेचा संदेश देणारा व ज्ञानप्रेम वाढविणारा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.