प्रतिनिधी//
रंगय्यापल्ली (ता.सिरोंचा ) – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रंगय्यापल्ली येथे आज दिनांक १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत रंगय्यापल्लीचे उपसरपंच श्री. बापूजी आतकुरी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी श्री. बी. ए. मारबोईना (उच्च श्रेणी मुख्याध्यापक) होते. या कार्यक्रमास केंद्रप्रमुख श्री. आय. जे. खान, पद.शि. श्री. एस. जी. धानोरकर, शिक्षक श्री. एल. एम. सद्दी, कु. व्ही. आर. वरगंटीवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात इयत्ता पहिली ते सातवीच्या २३ विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रभावी भाषणे देत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, त्यांचे कार्य व संविधानातील योगदान यावर प्रकाश टाकत समाजप्रबोधन केले.
प्रमुख पाहुणे श्री. बापूजी आतकुरी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सर्वांना प्रोत्साहनपर नोटबुक वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातवीतील कु. साईना दुर्गम व कु. अक्षरा आघाडी यांनी उत्तम प्रकारे पार पाडले. आभार प्रदर्शन कु. कावेरी गुरनुले हिने मानले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी अभिमान निर्माण झाला.