धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आचार,विचार,संस्कारांची निर्मित होते.खासदार अशोकजी नेते यांचे प्रतिपादन #jantechaawaaz#news#portal#

62

*श्री.श्री.बासंती दुर्गा पूजन रेगडी ता.चामोर्शी जि.गडचिरोली येथे द्वितीय वार्षिक महोत्सवी दुर्गा पूजनाचे आयोज








दिनांक ०२ एप्रील २०२३

चामोर्शी: श्री.श्री.बासंती दुर्गा पूजन द्वितीय वार्षिक महोत्सवी रेगडी येथील दुर्गा पुजा निमित्ताने खासदार अशोकजी नेते यांनी भाविक्तांना संबोधित करतांना  मागील दोन वर्ष कोरोणाच्या महामारी ने अशा पद्धतीचे   धार्मिक पूजन महोत्सव झालेले नाही.

या कोरोणामुळे माणसाची माणुसकी सुद्धा हरवून गेली होती.त्यामुळे अशा  धार्मिक पूजनाचे आयोजन करणे गरजेचे असून आजच्या काळाची गरज आहे.धार्मिक कार्यामुळे एकाग्रता, मनाचे चिंतन, मन उत्साहीत, प्रफुलित,आनंदित, राहतो.अशा या धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आचार,विचार,संस्काराची निर्मिती होते.असे प्रतीपादन खासदार अशोकजी नेते यांनी द्वितीय वार्षिक महोत्सवी दुर्गा पुजन कार्यक्रमाच्या प्रसंगी केले.

यावेळी खासदार अशोकजी नेते यांचे  श्री.श्री.बासंती दुर्गा मंडळातील लोकांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते, प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्निल वरघंटे, माजी. जि.प. सदस्य नामदेवराव सोनटक्के,बंगाली समाज आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश 

शहा,आदिवासी आ.तालुकाध्यक्ष विलास उईके,सरपंच प्रभाती वैद्य, विरेंद्रनाथ बिशवास सर,सोमनाथ वैद्य, सुरेश कोंडू, अनिल मलिक,नितीन मंडल उपस्थित होते.