माजी जि. प.अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम एटापली येथे पुगाटी व सिडाम यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू वरास शुभाशीर्वाद दिले

203

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

एटापल्ली – माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांनी मौजा एटापल्ली येथे संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वर-वधूला शुभेच्छा दिल्या. हा विवाह सोहळा श्री दसरू लालू पुंगाटी केंद्रप्रमुख येटापली यांचे ज्येष्ठ चिरंजीव पंकज आणि श्री गोपाल सिडाम (रा. कमलापूर) यांची ज्येष्ठ कन्या यांचा होता.

या मंगल सोहळ्यात भाग्यश्री ताई आत्राम यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी आणि समृद्ध वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी वर-वधूंच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आणि विवाह सोहळ्याच्या आयोजनाचे कौतुक केले. त्यांच्या आगमनाने संपूर्ण सोहळ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

विवाह सोहळ्याला अनेक प्रतिष्ठित मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि मांगल्यपूर्ण वातावरणात पार पडला.